Marathi News> भारत
Advertisement

'..तर, अविश्वास ठराव दाखल करू!' मोदी सरकारला धमकी

 एनडीएतील धुसफूस वाढली असून, घटक पक्ष शिवसेनेनंतर तेलगू देसमनेही आपली नाराजी बोलून दाखवली आहे. आपल्या मागण्या मान्य करा अन्यथा सरकारवर अविश्वास ठराव आणण्याखेरी आम्हाला पर्याय राहणार नाही, असा टोकाचा विचार तेलगू देसमने बोलून दाखवला आहे.

'..तर, अविश्वास ठराव दाखल करू!' मोदी सरकारला धमकी

अमरावती: देशात सार्वत्रिक निवडणुकांचे बिगूल वाजण्यापूर्वी केंद्रातील भाजप प्रणीत मोदी सरकारसमोर एक भलतेच आव्हान उभे ठाकले आहे. भाजपच्या दादागिरीविरूधात एनडीएतील धुसफूस वाढली असून, घटक पक्ष शिवसेनेनंतर तेलगू देसमनेही आपली नाराजी बोलून दाखवली आहे. आपल्या मागण्या मान्य करा अन्यथा सरकारवर अविश्वास ठराव आणण्याखेरी आम्हाला पर्याय राहणार नाही, असा टोकाचा विचार तेलगू देसमने बोलून दाखवला आहे.

भाजपच्या आरेरावीविरूद्ध शिवसेना, तेलगू देसम नाराज

शिवसेना आणि तेलगू देसम या एनडीएतील घटक पक्ष भाजपच्या अरेरावीविरूद्ध गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत. पण, केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्यापासून चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम काहीसा अधिकच नाराज झाला आहे. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळेल असा तेलगू देसमचा अंदाज होता. मात्र, तेुलगू देसमचा हा अंदाज चुकला. तव्हापासून तेलगू देसमच्या नाराजीत वाढ झाली आहे. विशेष राज्याचा दर्जा मिळावा ही गेली अनेक वर्षे आंध्र प्रदेशची मागणी राहिली आहे.

इतर पक्षांची मदत घेऊन अविश्वास ठराव दाखल करू

दरम्यान, एनडीएतील घटक पक्षांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपने गेल्या काही दिवसात डॅमेज कंट्रोल केले. त्यानंतर सर्व काही ठिक चालले आहे अशा बातम्याही आल्या. पण, आज चंद्राबाबू नायडू यांनी भाजपवर थेट निशाणा साधला आहे. आंध्र प्रदेशला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा पण तो जर मिळत नसेल तर, आम्हाला या सरकारविरोधात अविश्वास ठराव दाखल करावा लागेल. मोदी सरकार विरोधात आम्ही इतर पक्षांचे सहकार्य घेऊन अविश्वास ठराव दाखल करू असेही चंद्राबाबूंनी म्हटले आहे.

Read More