Marathi News> भारत
Advertisement

RBI चा या बँकेला मोठा दिलासा दिला, PCA निर्बंधातून मिळाला दिलासा

Indian Overseas Bank out of PCA: इंडियन ओव्हरसीज बँकेला (IOB) मोठा दिलासा देताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) त्याला प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अॅक्शन फ्रेमवर्कमधून (PCAF) बाहेर काढले आहे.  

RBI चा या बँकेला मोठा दिलासा दिला, PCA निर्बंधातून मिळाला दिलासा

 मुंबई : Indian Overseas Bank out of PCA: इंडियन ओव्हरसीज बँकेला (IOB) मोठा दिलासा देताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) त्याला प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अॅक्शन फ्रेमवर्कमधून (PCAF) बाहेर काढले आहे. विविध मापदंडांमध्ये सुधारणा करण्याची आणि त्याच्या किमान भांडवली निकषांचे पालन करण्याच्या लेखी हमीनंतर बँकेला हा दिलासा मिळाला आहे. (RBI removes Indian Overseas Bank from Prompt Corrective Action framework)

IOB च्या कामगिरीचा आढावा घेतल्यावर, आर्थिक देखरेख मंडळ, (Board for Financial Supervision) 2020-21साठी प्रकाशित आर्थिक निकालांवर आधारित असे दिसून आले की बँक पीसीए पॅरामीटरचे उल्लंघन करत नाही, असे आरबीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

इंडियन ओव्हरसीज बँकेने चांगली कामगिरी 

fallbacks

तसेच इंडियन ओव्हरसीज बँकेने एक लेखी वचनदेखील दिले आहे की, ती किमान नियामक भांडवल, नेट एनपीए आणि लीव्हरेज रेशियोच्या निकषांचे सातत्याने पालन करेल. IOB ने RBI ला स्ट्रक्चरल आणि सिस्टीमिक सुधारणांबाबतही कळवले आहे, जे बँकेला या वचनबद्धतेची पूर्तता करण्यास मदत करेल.

2015 मध्ये बँकेवर PCA 

RBIने सांगितले की, या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, काही विशिष्ट अटी आणि सतत देखरेखीसह इंडियन ओव्हरसीज बँकेला पीसीए (PCA) निर्बंधातून बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, 2015 मध्ये इंडियन ओव्हरसीज बँक पीसीए निर्बंधाखाली आणण्यात आली.

यूको बँकेलाही याच महिन्यात दिलासा 

दुसरीकडे सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला RBIने यूको बँकेला  (UCO Bnak) पीसीएच्या (PCA) चौकटीतून बाहेरही आणले. मात्र, सार्वजनिक क्षेत्रातील बँक सेंट्रल बँक ऑफ इंडियावर अजूनही पीसीएचे (PCA) निर्बंध लादले गेले आहेत.

बँकांवर पीसीए केव्हा लावतात

बँकांवर पीसीए (PCA) केव्हा लावला जातो, असा प्रश्न पडतो. ज्यावेळी बँक आरबीआयचे जे नियम आहेत. त्याचे पालन करत नाही. ज्यावेळी काही नियामक निकषांचे पालन करत नाहीत. जसे की मालमत्ता परतावा, किमान भांडवल आणि एनपीएचे प्रमाण. या निकषांचा भंग झाला की बँकेवर निर्बंध लादले जातात.

शेअर बाजारात IOB चे शेअर्स BSE वर 0.74 टक्क्यांच्या वाढीसह 20.50 रुपयांवर बंद झाले. आरसीआयने बँक बंद केल्यानंतर पीसीएमधून बाहेर काढण्याचा निर्णय बाजार बंद झाल्यानंतर आला आहे. बँकेने मार्च 2021 मध्ये संपलेल्या वर्षासाठी 831 कोटी रुपयांचा वार्षिक निव्वळ नफा नोंदवला आहे.

Read More