Marathi News> भारत
Advertisement

RBIची मोठी कारवाई! या बँकेचे लायसन्स थेट रद्द; तुमचे खाते तर नाही ना..?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मोठी कारवाई केली आहे. यूपीच्या पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केला.

RBIची मोठी कारवाई! या बँकेचे लायसन्स थेट रद्द; तुमचे खाते तर नाही ना..?

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मोठी कारवाई केली आहे. यूपीच्या पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केला. 17 मार्च रोजी आरबीआयने यासाठी आदेश जारी केला, की पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, कानपूर, उत्तर प्रदेशचा परवाना रद्द करण्यात आला आहे. म्हणजेच आता 21 मार्च 2022 पासून बँकेने बँकिंग सेवा आणि व्यवसाय करणे बंद केले आहे. यूपीचे सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांच्या निबंधकांनाही बँक बंद करण्याचा आदेश जारी करून बँकेसाठी लिक्विडेटर नियुक्त करण्याचे निर्देश आरबीआयने दिले आहेत.

आरबीआयने आदेशात काय म्हटले?

आरबीआयने या आदेशात म्हटले आहे की, 'बँकेची आर्थिक स्थिती ठिक नाही. बँक ठेवीदारांना पूर्ण पैसे देऊ शकत नाही. ती चालू ठेवल्यास लोकांच्या हितावर परिणाम होईल. पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेला "बँकिंग" चा व्यवसाय करण्यास मनाई होती, ज्यात ठेवी स्वीकारणे आणि परतावा देणे समाविष्ट आहे.

 परवाना का रद्द केला?

पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द करण्यामागे आरबीआयने कारणे दिली आहेत. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, बँकेकडे पुरेसे भांडवल नाही आणि उत्पन्नाचा कोणताही स्रोत नाही, त्यामुळे बँकिंग नियमन कायद्यातील तरतुदींचे पालन करण्यास ती सक्षम नाही. एवढेच नाही तर बँकेने नियमन कायद्यातील काही तरतुदीही पाळल्या नाहीत. बँक पुढे चालू ठेवल्यास त्याचा परिणाम ठेवीदारांवर होईल, असे आरबीआयचे म्हणणे आहे. 
 

Read More