Marathi News> भारत
Advertisement

Viral Video: पोरीची छेड काढली अन् वरून दादागिरी; भर रस्त्यात पोलिसाने दाखवला इंगा, पाहा कसा उतरवला माज!

Police man beaten youth on street: तरुणाने पोलिसांच्या गचुंडी धरून मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यावेळी पोलीसाच्या हातात बॅग असताना देखील त्याने एका हाताने तरुणाला लोळवलं. 

Viral Video: पोरीची छेड काढली अन् वरून दादागिरी; भर रस्त्यात पोलिसाने दाखवला इंगा, पाहा कसा उतरवला माज!

Chhatarpur Viral Video: मागील पाच वर्षात देशातील गुन्हेगारी वाढल्याचं चित्र आहे. गावगुंड, चौकातील गुंडांनी कहर केल्याचं दिसतंय. कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असताना नवीन आणि धक्कादायक प्रकार समोर येत आहे. अशातच आता मध्यप्रदेशच्या  छतरपूरमधून नवा व्हिडिओ (MP Trending Video) समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. (Rawadi boy Misbehave with girl and threatened police man beaten youth on street watch Viral Video)

दिवसाढवळ्या मुलीची छेड काढणाऱ्या आणि वरुन पोलिसाला दादागिरीच्या भाषेत बोलणाऱ्या एका तरुणाला पोलीस कॉन्स्टेबलनं (Police Constable) जन्माची अद्दल घडवली. भर रस्त्यात या तरुणाला पोलीस कॉन्स्टेबलनं चांगला चोप दिल्याचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त करत तरुणाला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

नेमकं काय झालं?

मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये तरुणीचा विनयभंग आणि नंतर पोलिसाला मारहाण केल्याची घटना समोर आली. आरोपी काँग्रेसचा युवा नेता असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस हवालदार यांच्यासह झालेल्या भांडणानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. घटना सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पन्ना ब्लॉकची आहे. आरोपी अजय प्रतापसिंग बघेल हा जिल्हा काँग्रेस झोपडपट्टी सेलचा शहर उपाध्यक्ष आहे. 

अजय प्रतापसिंग बघेल हा तरुणीसोबत फ्लर्ट करत होता, असं सांगण्यात येत आहे. त्याचवेळी एक पोलीस कर्मचारी त्याठिकाणहून जात होता. त्यावेळी एका पोलीस हवालदाराने त्याला असं करण्यापासून रोखलं. मात्र, तरुणाला पोलीसाचं हटकन आवडलं नाही. त्याने पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली.  हाच उचलण्याचा प्रयत्न करणाऱ्या या तरुणाची पोलिसानं चांगलीच धुलाई केली. 

पाहा Video

दरम्यान, तरुणाने पोलिसांच्या गचुंडी धरून मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यावेळी पोलीसाच्या हातात बॅग असताना देखील त्याने एका हाताने तरुणाला लोळवलं. त्यानंतर त्याने बॅग दुसऱ्या एका तरुणाच्या हातात देऊन तरुणाला खाकी दाखवली आणि त्याला पोलीस स्टेशनला नेलं. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा नोंद झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.

Read More