Marathi News> भारत
Advertisement

Ration Card : मोफत अन्नधान्य घेणाऱ्या 'या' रेशन कार्डधारकांची आता खैर नाही

Ration Card news | सर्वसामांन्यांना अतिशय कमी दरात शिधादुकानातून अन्नधान्य पुरवलं जातं. तसेच मोफत अन्नाधान्यही दिलं जातं.

Ration Card : मोफत अन्नधान्य घेणाऱ्या 'या' रेशन कार्डधारकांची आता खैर नाही

मुंबई : सर्वसामांन्यांना अतिशय कमी दरात शिधादुकानातून अन्नधान्य पुरवलं जातं. तसेच मोफत अन्नाधान्यही दिलं जातं. कोणीही उपाशीपोटी झोपू नये, कोणाचीही उपासमार होऊ नये, या उद्देशाने शासनाकडून अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. मात्र काही जण याचा गैरफायदा घेतात. मोफत मिळणाऱ्या अन्नधान्यासाठी अपात्र असेलले रेशन कार्डधारकही याचा गैरफायदा घेत अन्नधान्य घेतात. आता अशा फुकट्या रेशन कार्डधारकांविरोधात शासनाने मोठं पाऊल उचललं आहे. (ration card these card holders taking free ration are not well legal action will be taken with recovery)

मोफत मिळणाऱ्या अन्नधान्यासाठी अपात्र असणाऱ्या रेशन कार्डधारकांना सरकारने इशारा दिला आहे. मोफत अन्नधान्य लाटणाऱ्या अपात्र शिधाधारकांना रेशन कार्ड सरेंडर करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच रेशन कार्ड सरेंडर न करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाऊ शकते. 

बोगस रेशन कार्डाबाबत अनेक तक्रारी

सरकारला वारंवार बोगस रेशन कार्डाद्वारे फुकटात अन्नधान्य घेणाऱ्यांबाबत अनेक तक्रारी मिळाल्या आहेत. अशा फुकट्या बोगस रेशन कार्डधारकांविरोधात सरकारकडून तपास केला जात आहे.

तसेच उत्तराखंडात वसूलीसह बोगस रेशन कार्डधारकांविरोधात गुन्हाही दाखल केला जाऊ शकतो. 

Read More