Marathi News> भारत
Advertisement

रामजन्मभूमी - बाबरी मशीद जमीन वादाची आज सुनावणी

 रामजन्मभूमी - बाबरी मशीद जमीन वादाची सुनावणी महत्त्वाच्या आणि अंतिम टप्प्यात आहे. 

रामजन्मभूमी - बाबरी मशीद जमीन वादाची आज सुनावणी

नवी दिल्ली : राजकीयदृष्टय़ा संवेदनशील ठरलेल्या आणि दीर्घकाळ लांबलेल्या रामजन्मभूमी - बाबरी मशीद जमीन वादाची सुनावणी आज महत्त्वाच्या आणि अंतिम टप्प्यात प्रवेश करणार आहे. विजयादशमीनिमित्त आठ दिवसांच्या सुटीनंतर सर्वोच्च न्यायालय या प्रकरणी ३८व्या दिवशी सुनावणी पुन्हा सुरू करणार आहे. दरम्यान, येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

या त्रासदायक वादात मध्यस्थीच्या प्रक्रियेतून सौहार्दपूर्ण समझोत्याचे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या घटनापीठाने या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करण्यासाठीच्या मुदतीत सुधारणा करून त्यासाठी १७ ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली आहे.

त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयातील अयोध्या रामजन्मभूमी प्रकरणातील सुनावणी संपुष्टात येणार आहे. अयोध्या निर्णयाबाबत जिल्हा प्रशासन सतर्क आहे. संभाव्य निर्णयाबाबत १० डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. दिवाळी, चेहल्लुम आणि कार्तिक जत्राबाबत अयोध्या जिल्ह्यात कलम १४४ लागू होईल. जिल्हाधिकारी अनुजकुमार झा यांनी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

Read More