Marathi News> भारत
Advertisement

राज्यसभा खासदार Dr.Subhash Chandra तिरुपति बालाजी दर्शनाला

राज्यसभा खासदार आणि झी समूहाचे संस्थापक डॉ. सुभाष चंद्रा  (Dr Subhash Chandra) हे प्रसिद्ध धार्मिक स्थळ श्री व्यंकटेश्वर स्वामी येथे दर्शनासाठी पोहोचले.

राज्यसभा खासदार Dr.Subhash Chandra तिरुपति बालाजी दर्शनाला

तिरुपति : राज्यसभा खासदार आणि झी समूहाचे संस्थापक डॉ. सुभाष चंद्रा  (Dr Subhash Chandra) हे प्रसिद्ध धार्मिक स्थळ श्री व्यंकटेश्वर स्वामी येथे दर्शनासाठी पोहोचले. तिरुमला डोंगरात वसलेले हे मंदिर तिरुपति बालाजी म्हणून प्रसिद्ध आहे.

मंदिरात पोहोचताच राज्यसभा खासदार यांनी विधिवत पूजा केली. मंदिराच्या महाद्वारावर ते जेव्हा पोहोचले तेव्हा टीटीडीचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी अेवी धर्मारेड्डी यांच्यासह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डॉ. सुभाष चंद्रा यांचं स्वागत केलं.

fallbacks

प्रसादासह आशीर्वाद

श्री बालाजी दर्शनानंतर खासदार सुभाष चंद्रा यांना रंगनायकुल मंडपात वैदिक विद्ववानांच्या उपस्थितीत  'वेदआशीर्वचनम' देण्यात आला. हा ईश्वराचा विशेष आशीर्वाद असतो, ज्याला पुजारी वेदपाठाच्या माध्यमातून देतात. 

fallbacks

मंदिर व्यवस्थापनाकडून या दरम्यान तीर्थ प्रसादम आणि नवीन वर्षासाठी खास बनवण्यात आलेली विशेष टीटीडी डायरी देण्यात आली. यासह यावेळी डॉ.सुभाष चंद्रा यांना भगवान बालाजी यांचं कॅलेंडरही भेट म्हणून देण्यात आलं.

TTD च्या प्रयत्नांचं कौतुक

विधिवत पूजा संपन्न झाल्यानंतर डॉ.सुभाष चंद्रा यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. डॉ.सुभाष चंद्रा यांनी हिंदू धर्म प्रचाराच्या दिशेने टीटीडीने केलेल्या कार्याचं कौतुक केलं. यावेळी मंदिर व्यवस्थापनाशी संबंधित अनेक दिग्गज अधिकारी उपस्थित होते.

Read More