Marathi News> भारत
Advertisement

'हॅपी बर्थडे पापा' म्हणत स्कॉलर विद्यार्थ्याने मृत्यूला कवटाळलं; दरवाजा तोडताच पोलिसांना दिसलं हादरवणारं दृश्य

Rajasthan Crime : उत्तर प्रदेशच्या विद्यार्थ्याने कोटामध्ये वसतीगृहात आपलं जीवन संपवल्याने एकच खळबळ उडाली आहे. नीट परीक्षेसाठी कोटा येथे आल्याने वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत स्वतःला संपवलं आहे.

'हॅपी बर्थडे पापा' म्हणत स्कॉलर विद्यार्थ्याने मृत्यूला कवटाळलं; दरवाजा तोडताच पोलिसांना दिसलं हादरवणारं दृश्य

Rajasthan Crime : राजस्थानच्या (Rajasthan) कोटा (Kota) शहरातून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. कोटामध्ये नीट (NEET) परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने पत्र लिहीत आपली जीवनयात्रा धक्कादायकरित्या संपवली आहे. कोटा येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलेल्या गोष्टी हृदय पिळवटून टाकणाऱ्या आहेत. विद्यार्थ्याने आपल्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन मृत्यूला कवटाळले आहे. तरुणाने तोंडाला प्लास्टिकची पिशवी गुंडाळली होती. खोलीच्या भिंतीवर सुसाईड नोट चिकटवत माझ्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरु नका असे तरुणाने म्हटलं आहे.

18 वर्षीय मनजोत छाबरा रामपूर उत्तर प्रदेशचा रहिवासी होता. तो राजस्थानच्या कोटा येथे वसतिगृहात राहून नीट परीक्षेची तयारी करत होता. गुरुवारी सकाळी 9.30 च्या सुमारास त्याच्या मित्रांनी मनजोतला फोन केला होता. मनजोतने फोन उचलला नाही म्हणून मित्रांनी त्याच्या वसतिगृह चालकाला याबाबत माहिती दिली. वसतिगृह चालकाने तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. वसतिगृहात पोहोचताच पोलिसांनी दरवाजा तोडून पाहिले असता मनजोत मृतावस्थेत आढळून आला. पोलिसांनी मनजोतचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

मनजोतने आत्महत्या कशी झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मनोजच्या खोलीचा दरवाचा आतून बंद होता. पोलिसांनी मनजोतच्या खोलीत प्रवेश केला तेव्हा त्याच्या तोंडावर प्लास्टिकची पिशवी बांधलेली होती. यासोबत त्याच्या एका हातात दोरी बांधलेली होती. पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही सापडली आहे. त्यामध्ये त्याने स्वत:ला मृत्यूसाठी जबाबदार असल्याचे सांगितं आले आहे. कोटाच्या विज्ञाननगर येथील ढाकनिया येथे हा सगळा प्रकार घडला आहे.

चार महिन्यांपूर्वीच आला होता राजस्थानमध्ये

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनजोत चार महिन्यांपूर्वीच कोटा येथे आला होता. तो वसतीगृहात एकटाच राहत होता. आत्महत्येच्या आदल्या दिवशी संध्याकाळी आठ वाजचा कोचिंग क्लासवरुन तो खोलीत परतला होता. त्यानंतर तो खोलीच्या बाहेर आलाच नाही. दुसऱ्या दिवशी तो सकाळी नऊ वाजेपर्यंत खोलीच्या बाहेर न आल्याने त्याच्या मित्रांनी त्याला फोन करण्यास सुरुवात केली. त्याचे मित्र मनजोतच्या खोलीजवळ गेले पण दरवाजा आतून बंद होता. मुलांनी कोचिंग क्लासच्या संचालकांना आणि वसतीगृह चालकाला याची माहिती दिली. त्यानंतर वसतीगृह चालकाने पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर सव्वा दहाच्या सुमारास पोलीस तिथे  पोहोचले. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा मनजोत मृतावस्थेत पडला होता. त्याच्या चेहऱ्यावर प्लास्टिक गुंडाळले होते आणि हाताला दोरी बांधली होती.

मनजोतची अवस्था पाहून पोलिसांना त्याचा मृत्यू संशयास्पद वाटत होता. मात्र खोलीचा तपास केला असता तिथे एक सुसाईट नोट सापडली. त्यामध्ये त्याने स्वतःला मृत्यूसाठी जबाबदार ठरवलं आहे. पोलिसांनी मनजोतच्या कुटुंबियांना त्याच्या मृत्यूची बातमी दिली होती.

काय होतं सुसाईड नोटमध्ये?

माझ्या कुटुंबाला आणि माझ्या मित्रांना त्रास देऊ नका. मी हे माझ्या स्वेच्छेने करत आहे, असे मनजोतने सुसाईड नोटमध्ये लिहीलं होतं. यासोबतच मनजोतने 'हॅपी बर्थडे पापा' असेही लिहिले आहे.

आत्महत्या करणाऱ्यांमध्ये पुढचा क्रमांक माझा असेल

मनजोतच्या मित्रांनी सांगितले की तो हुशार विद्यार्थी होता आणि विनोदी स्वभावाचा होता. त्याने बारावीत 93 टक्के गुण मिळवले होते आणि क्लासमधील परीक्षांमध्ये तो नेहमीच चांगले गुण मिळवायचा. कोटामधील वाढत्या आत्महत्यांबाबत जेव्हा चर्चा व्हायची तेव्हा मनजोत नेहमी म्हणायचा की, माझाच पुढचा नंबर असणार आहे. मात्र तेव्हा सगळे ही गोष्ट मस्करीमध्ये घ्यायचे.

Read More