Marathi News> भारत
Advertisement

रेल्वेत पुन्हा एकदा मोठी भर्ती, 1 ऑक्टोबरपर्यंत करा अर्ज

रेल्वेत नोकरीची सुवर्ण संधी

रेल्वेत पुन्हा एकदा मोठी भर्ती, 1 ऑक्टोबरपर्यंत करा अर्ज

नवी दिल्ली : Railway Recruitment Board (RRB) च्या परीक्षांचा काळ सध्या सुरु आहे. त्यातच रेल्वेने आणखी काही पदांसाठी भर्ती सुरु केली आहे. रेल्वेमध्ये 64371 पदांसाठी अर्ज मागवण्यात येणार आहेत. ज्यामध्ये असिस्टंट लोको पायलट आणि टेक्नीशियन या पदांसाठी भर्ती होणार आहे. 01 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही या पदासांठी अर्ज करु शकता.

असिस्टटेंट लोको पायलटची भर्ती

Railway Recruitment Board (RRB) ने रेल्वेमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांची कमतरता भरुन काढण्यासाठी एकूण 27795 असिस्टंट लोको पायलटची भर्ती करणार आहे. रेल्वेच्या विविध विभागांसाठी ही भर्ती केली जाणार आहे. टेक्नीशियन या पदासाठी 36576 जागा असणार आहेत. Railway Recruitment Board (RRB) च्या असिस्टंट लोको पायलटची भर्ती ही सर्वाधिक नॉर्थ सेंट्रल रेल्वे आणि ईस्ट कोस्ट रेल्वेमध्ये केली जाणार आहे. नॉर्थ सेंट्रल रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलटसाठी 3019 जागा आहेत तर ईस्ट कोस्ट रेल्वेमध्ये 2228 जागा आहेत.

Read More