Marathi News> भारत
Advertisement

राहुल गांधी म्हणजे नाल्यातला कीडा; भाजपच्या मंत्र्यांची जीभ घसरली

राहुल गांधी मनोरुग्ण आहेत, त्यांना रुग्णालयात भरती केले पाहिजे. 

राहुल गांधी म्हणजे नाल्यातला कीडा; भाजपच्या मंत्र्यांची जीभ घसरली

नवी दिल्ली: भाजपमधील वाचाळवीर नेत्यांकडून करण्यात येणारी वादग्रस्त विधाने ही काही नवीन बाब राहिलेली नाही. यामध्ये आता केंद्रीय राज्यमंत्री अश्वनी चौबे यांची भर पडली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करताना अश्वनी चौबे यांची जीभ भलतीच घसरली. त्यांनी राहुल गांधींना थेट नाल्यातील कीडा असल्याचे म्हटले. 

राहुल गांधींना मेंटल सिजोफ्रेनियाचा आजार आहे. त्यांना रुग्णालयात भरती केले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आकार आभाळासारखा आहे. त्यांच्यासाठी अपशब्द वापरणारे काँग्रेसचे अध्यक्षच घाणेरड्या नाल्यातील किडा आहेत. ते स्वतःच काँग्रेस मुक्त भारत करतील, असे चौबे यांनी म्हटले. चौबे यांच्या या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या टीकेला आता काँग्रेस नेते कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

Read More