Marathi News> भारत
Advertisement

गुजरात-हिमाचल निकालाआधी काँग्रेसचा बंपर विजय, सिद्धू म्हणतात...

गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकीचे निकाल यायला आता अवघे काही तास उरले आहेत.

गुजरात-हिमाचल निकालाआधी काँग्रेसचा बंपर विजय, सिद्धू म्हणतात...

नवी दिल्ली : गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकीचे निकाल यायला आता अवघे काही तास उरले आहेत. पण त्याआधी काँग्रेससाठी एक आनंदाची बातमी आहे. पंजाबमधल्या नगरपालिकांच्या निवडणुकींमध्ये काँग्रेसचा विजय झाला आहे.

जलंधर नगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसनं ६६ वॉर्डांमध्ये, भाजपनं ८ वॉर्डांमध्ये, शिरोमणी अकाली दलानं ४ आणि अपक्षांना २ जागांवर विजय मिळाला. अमृतसर नगरपालिकेमध्ये काँग्रेसनं ६९, भाजपनं ६, शिरोमणी अकाली दलानं ६ आणि ४ जागांवर अपक्षांचा विजय झाला आहे. तसंच पटियाला नगरपालिका निवडणुकीमध्येही काँग्रेसचा जोरदार विजय झाला आहे.

काँग्रेस अध्यक्ष झाल्यावर राहुल गांधींनी पहिल्यांदाच यशाची चव चाखली आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या पगडीचा हा तिसरा विजय आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते आणि पंजाबमधील मंत्री नवजोतसिंग सिद्धू यांनी दिली आहे. 

Read More