Marathi News> भारत
Advertisement

जनधन योजनेतील ६ कोटी खाती निष्क्रिय

देशातील एकूण ३१ कोटी रुपये जनधन खात्यांपैकी तब्बल २० टक्के खाती निष्क्रिय असल्याची माहिती केंद्र सरकारने दिलीये. अर्थ राज्य मंत्री शिव प्रताप शुक्लाने राज्यसभेत लिखित उत्तर देताना ही माहिती दिली. फेब्रुवारीपर्यंत उघडण्यात आलेल्या ३१.२० कोटी जनधन खात्यांमध्ये सुमारे ७५ हजार कोटी रुपये जमा करण्यात आले. ज्यातील २५.१८ कोटी खात्यांमध्ये देण्याघेण्याचे व्यवहार सुरु आहेत. याचाच अर्थ प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत खोलण्यात आलेली ६ कोटीहून अधिक खाती निष्क्रिय आहेत. 

जनधन योजनेतील ६ कोटी खाती निष्क्रिय

नवी दिल्ली : देशातील एकूण ३१ कोटी रुपये जनधन खात्यांपैकी तब्बल २० टक्के खाती निष्क्रिय असल्याची माहिती केंद्र सरकारने दिलीये. अर्थ राज्य मंत्री शिव प्रताप शुक्लाने राज्यसभेत लिखित उत्तर देताना ही माहिती दिली. फेब्रुवारीपर्यंत उघडण्यात आलेल्या ३१.२० कोटी जनधन खात्यांमध्ये सुमारे ७५ हजार कोटी रुपये जमा करण्यात आले. ज्यातील २५.१८ कोटी खात्यांमध्ये देण्याघेण्याचे व्यवहार सुरु आहेत. याचाच अर्थ प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत खोलण्यात आलेली ६ कोटीहून अधिक खाती निष्क्रिय आहेत. 

५० लाखाहून अधिक खाती बंद

शिव प्रताप शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही योजना सुरु झाल्यानंतर फेब्रुवारीपर्यंत तब्बल ५९ लाख जनधन खाती बंद करण्यात आली. खातेधारकांनी केलेल्या विनंतीनंतर जनधन खाती बंद करण्यात आली. 

२०१४मध्ये सुरु झाली होती योजना

जनधन योजनेची घोषणा १५ ऑगस्ट २०१४मध्ये पंतप्रधान नरेंद्र यांनी केली होती. याची सुरुवात २८ ऑगस्ट २०१४मध्ये झाली. याची सुरुवात म्हणून पंतप्रधानांनी सर्व बंकांना ईमेल पाठवले. योजनेच्या उद्घाटनाच्या दिवशी १.५ कोटी बँक खाती खोलण्यात आली.  

Read More