Marathi News> भारत
Advertisement

Independence Day 2021 | गावात नव्या अर्थव्यवस्थेसाठी योजना - पंतप्रधान नरेंद्र मोदी

ऑलिम्पिक खेळाडूंचं अभिनंदन करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना दिली प्रेरणा

 Independence Day 2021 | गावात नव्या अर्थव्यवस्थेसाठी योजना - पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली :  देशाला नवी देणारं, स्वातंत्र्य, समता एकतेचं महत्त्व सिद्ध करणारा आजचा हा स्वातंत्र्यदिन देश साजरा करत आहे. लाल किल्ल्यावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत आहेत. यावेळी त्यांनी अनेक गोष्टींना प्राधान्य देत देश विकासाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं सांगितलं. अमृत महोत्सव दिनाचं औचित्य साधत मोदींनी उपस्थित ऑलिम्पिक खेळाडूंचं अभिनंदन करण्यात आलं. यावेळी त्यांनी देशवासियांना टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करण्याचं आवाहन केलं. त्यानंतर त्यांनी 14 ऑगस्टचं महत्त्व पटवून दिलं.  

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, 'आजपासून प्रत्येकवर्षी फाळणी वेदना स्मृतिदिन म्हणून पाळला जाणार आहे. .ज्यांनी अत्याचार सहन केले, सन्मानासोबत अंत्यसंस्कारही मिळाले नाही ते आपल्या आठवणीत जिवंत राहणं गरजेचं आहे. आजही देशाच्या काही भागात पूर, भूस्खलन होत आहे. अनेक ठिकाणी लोक समस्यांचा सामना करत आहे. यावेळी केंद्र सरकार राज्य सरकारांसोबत आहे. '

'कोरोना काळ अत्यंत कठीण आहे, या लढ्यात अनेक अव्हाने समोर होती. पण भरताने योग्य कार्य केलं. आज भारताला लसीकरणासाठी दुसऱ्या देशावर अवलंबून राहण्याची गरज नाही. 54 कोटीहून अधिक लोकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. संकटकाळात लाखो कुटुंबाला मोफत अन्नसाठा पुरवण्यात आला. 

'नव्या संकल्पांना घेवून पुढे जायचं आहे. हा आता अमृत काळ आहे. अमृत काळचं लक्ष्य -  ज्याठिकाणी सुविधा पूर्ण असतील, नागरिकांच्या जीवनात सरकार दखल देवू शकत नाही, आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर... संकल्प पूर्ण करण्यासाठी  मेहनतीची गरज, त्यामुळे परिश्रमाला पराक्रमची जोड  करून स्वप्न करण्याचा विश्वास मोदींनी व्यक्त  केला. 

मोदी पुढे म्हणाले, ' यशस्वी भारत  हे अमृत महोत्वाचं लक्ष्य आहे. यशस्वी भारतासाठी एका नागरिकाच्या रूपात  प्रत्येकाने बदलालय हवं. सबका साथ सबका विकास...  सरकारी योजनांची गती वाढली आहे. शतप्रतिशत हा मंत्र वापरून वाटचाल करण्याची गरज सध्या आहे. गरीब महिला मुलांमधील कुपोषण दूर कराय़चे आहे.  गरिबांना आता पोषणय़ुक्त तांदूळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

' देशात वैद्यकिय सुविधा प्रत्येकार्यंत पोहोचणार. वैद्यकिय शिक्षणात महत्तवाचे बदल करण्याची गरज आहे. देशातील सर्व क्षेत्रांना पुढे नेण्याचा मानस आहे. दलित, आदिवासी ओबीसींसाठी वैद्यकिय शिक्षण आरक्षण,  विकास यात्रेत सर्व घटक सहभागी असणार आहेत. लडाख ईशान्य भारतही विकास यात्रेत सहभागी आहेत.  

'जम्मू असो किंवा काश्मीर विकासाचं संतुलन दिसत आहे. जम्मू काश्मीर मध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी होत आहे. गावात नव्या अर्थव्यवस्थेसाठी योजना करण्याची पूर्ण तयारी आहे. खेड्यातही व्यवसायिक तयार होत आहे.' अशा अनेक मुद्दांवर मोदींनी भाष्य केलं. 

Read More