Marathi News> भारत
Advertisement

भूत बनून गुपचूप लपून बसला तरुण, पण जे घडले ते फारच मजेशीर, पाहा Prank Video

खरंतर हा तरुण भुतासारखे कपडे घालतो आणि मग शांतपणे दाराच्या मागे जाऊन गादीवर बसतो, पण...

भूत बनून गुपचूप लपून बसला तरुण, पण जे घडले ते फारच मजेशीर, पाहा Prank Video

मुंबई : आपल्याला नेहमीच सोशल मीडियावर वेगवेगळे कन्टेन्ट पाहायला मिळतात. जे खूपच मनोरंजक असतात. यांपैकी काही व्हिडीओ हे मनोरंजक, आर्ट, सायन्स, जेवणासह आणखी वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जे पाहायला लोकांना फार आवडते. आपल्याला बहुतेक करुन सोशल मीडीयावर काही मजेशीर व्हिडीओच पाहायला मिळतात. जे प्रँक किंवा खोड्यांशी संबंधीत असतात. असाच एक मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे. जो तुम्हाला पोट धरुन हसायला भाग पाडेल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती भुताच्या कपड्यांमध्ये असतो आणि तो कोणाला तरी घाबरवण्यासाठी तयारीत असतो. परंतु तेव्हाच त्याच्यासोबत असा काही विचित्र प्रकार घडतो, जे पाहून तुम्हाला तुमचं हसु आवरणार नाही.

खरंतर हा तरुण भुतासारखे कपडे घालतो आणि मग शांतपणे दाराच्या मागे जाऊन गादीवर बसतो. पण तो कोणाला तरीही घाबरवण्याआधी, तो स्वतःचे नुकसान करतो. वास्तविक, तरुण गादीवर बसताच ती गादी खाली सरकू लागते. स्वतःला खाली येताना पाहून हा तरुण तेथील दरवाजाचा आधार घेतो.

आता त्यानंतर जे घडलं ते आणखीनच मजेशीर आहे. या मुलाने स्वत:ला वाचवण्यासाठी दरवाजाची मदत घेताच तो दरवाजाही खाली कोसळला.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ही घटना मनोरंजक वाटत असली, तरी या घटनेवरुन तुमच्या लक्षात आलं असेल की, या तरुणाला किती दुखापत झाली असेल ती. तुम्ही हा व्हिडीओला उदाहरण म्हणून घ्या आणि अशी कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी थोडा विचार नक्की करा.

हा व्हिडीओ videolucu.funny च्या पेजवर देखील अपलोड करण्यात आले आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत.

Read More