Marathi News> भारत
Advertisement

'मी तुझी सर्वात मौल्यवान वस्तू हिसकावून घेतलीये,' मुलाच्या हत्येनंतर पूजाचा प्रियकराला फोन, अन् त्यानंतर...

Crime News: राजधानी दिल्लीतील (Delhi) इंद्रपुरी (Indrapuri) परिसरात 11 वर्षाच्या मुलाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी खुलासा केला आहे. पोलिसांनी 300 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या सहाय्याने हत्या करणाऱ्या आरोपी तरुणीला अटक केली आहे. पूजाने हत्या केल्यानंतर घरातील बेडमध्येच मुलाचा मृतदेह लपवून ठेवला होता.   

'मी तुझी सर्वात मौल्यवान वस्तू हिसकावून घेतलीये,' मुलाच्या हत्येनंतर पूजाचा प्रियकराला फोन, अन् त्यानंतर...

Crime News: राजधानी दिल्लीमधील इंद्रपुरी परिसरात एका 11 वर्षाच्या मुलाची हत्या केल्यानंतर खळबळ उडाली होती. घरामध्येच मुलाचा मतृदेह सापडला होता दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी एका तरुणीला बेड्या ठोकल्या असून, पूजा असं तिचं नाव आहे. दरम्यान आरोपी तरुणी आणि मुलाच्या वडिलांचं अफेअर होतं अशी माहिती समोर आली आहे. पूजाने दिव्यांशची हत्या केल्यानंतर त्याचे वडील म्हणजेच आपला एक्स बॉयफ्रेंड जितेंद्र याला फोन करुन 'मी तुझी सर्वात मौल्यवान वस्तू हिरावून घेतली आहे' असं सांगितलं होतं. पोलीस तपासात हा खुलासा झाला आहे. 

हत्येनंतर पोलीस कसून तपास करत होते. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 300 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. अखेर तीन दिवसांच्या मेहनतीनंतर 11 वर्षाच्या दिव्यांशची हत्या करणी आरोपी पूजा सापडली. तिन गेला दाबून दिव्यांशची हत्या केली होती. यानंतर तिने घरातील बेडमध्येच मृतदेह लपवून ठेवला होता. 

पोलीस चौकशीत आरोपी पूजाने सांगितलं की, आपला प्रियकर जितेंद्रने फसवणूक केल्याने नाराज होऊन आपण त्याच्या मुलाची हत्या केली. आरोपी पूजाचे जितेंद्रशी संबंध होते. दोघेही 2019 पर्यंत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. जितेंद्रने यावेळी आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन लग्न करण्याचं आश्वासनही दिलं होतं. पण 2022 मध्ये जितेंद्रने पूजासह नातं संपवलं आणि पुन्हा एकदा आपली पत्नी, मुलासह राहू लागला. 

प्रियकराला धडा शिकवण्यासाठी हत्या

प्रियकर आपल्याला सोडून गेल्याने पूजा नाराज होती. त्याला घडा शिकवायचा असा निश्चय तिने केला होता. जितेंद्र आपला मुलगा दिव्यांशमुळे तिच्याशी लग्न करण्यास नकार देत आहे असं पूजाला वाटत होतं. दिव्यांश हाच आपल्यातील महत्त्वाचा अडथळा असल्याचा तिचा समज झाला होता. 

पूजाने 10 ऑगस्टला आपल्या मैत्रिणीकडून जितेंद्रच्या घराचा पत्ता मिळवला. यानंतर ती इंद्रपुरीच्या घरी दाखल झाली असता दरवाजा उघडाच होता. दिव्य़ांश बेडवर झोपलेला होता आणि घरात कोणीच नव्हतं. हीच संधी साधत पूजाने गळा दाबून दिव्यांशला ठार केलं. यानंतर तिने बेडमध्येच दिव्यांशचा मृतदेह लपवला आणि पळ काढला. 

300 सीसीटीव्ही कॅमेरे, 3 दिवसांच्या मेहनतीनंतर पूजाला अटक

पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे पूजाची ओळख पटवली होती. यानंतर पूजाची माहिती मिळवण्यासाठी नजफगढ-नागलोई रोडवरील रणहौला, निहाल विहार आणि रिशल गार्डन परिसरातील 300 सीसीटीव्ही तपासण्यात आले. अखेर 3 दिवसांच्या मेहनतीनंतर आरोपी पूजाला बक्करवाला परिसरातून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर पूजानेही आपला गुन्हा कबूल केला आहे. 

Read More