Marathi News> भारत
Advertisement

पीएमसी बँकेच्या ग्राहकांना दिलासा, तर १० हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार

पीएमसी बँकेच्या खातेदारकांना दिलासा देणारी बातमी आहे.

पीएमसी बँकेच्या ग्राहकांना दिलासा, तर १० हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार

मुंबई : पीएमसी बँकेच्या खातेदारकांना दिलासा देणारी बातमी आहे. पीएमसी बँकेचे ग्राहक १० हजार रुपयांपेक्षा जास्तची रक्कम काढू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यासाठी ग्राहकाला पीएमसी बँकेच्या समितीला अर्ज करावा लागणार आहे. १० हजार रुपयांपेक्षा जास्तची रक्कम गंभीर आजार, लग्न आणि अत्यावश्यक कारणासाठी ही रक्कम काढता येईल.

मागच्या काही दिवसांपासून पीएमसीच्या ग्राहकांना गंभीर आजारावर उपचार करण्यासाठी आणि लग्नासाठीही खात्यातून पैसे काढता येत नव्हते. पण आता बँकेची समिती आरबीआयकडून मंजुरी घेऊन जास्त रक्कम देऊ शकणार आहे. पीएमसी बँकेतल्या घोटाळ्यानंतर आरबीआयने बँकेवर निर्बंध आणले. खात्यातून ६ महिन्यातून एकदा जास्तीतजास्त १० हजार रुपये काढता येतील, असे आदेश आरबीआयने दिले होते. आरबीआयच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर अडचण होत होती.

२४ सप्टेंबरला सगळ्यात पहिले आरबीआयने पीएमसी बँकेवर निर्बंध आणले, तेव्हा ग्राहकांना १ हजार रुपयेच काढण्याची परवानगी देण्यात आली होती. तसंच बँकेने नवीन कर्ज देऊ नये, असंही आरबीआयने सांगितलं होतं. 

Read More