Marathi News> भारत
Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी ३ आफ्रिका देशांच्या ५ दिवसीय दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारपासून ३ दिवस आफ्रिका देशांच्या दौऱ्यावर जात आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी ३ आफ्रिका देशांच्या ५ दिवसीय दौऱ्यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारपासून ३ दिवस आफ्रिका देशांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यादरम्यान भारत ब्रिक्स अंतर्गत महाद्वीपमध्ये द्विपक्षीय आणि त्यानंतर बहुपक्षीय संवाद साधणार आहे. रवांडा, युगांडा आमि दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यातून आफ्रीका महाद्विपसोबत आपले संबंध आणखी मजबूत होतील असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. गेल्या काही वर्षात आफ्रिकन देशांसोबत विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण करार झालेयंत. गेल्या चार वर्षात आपल्या देशातील राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान,मंत्र्यांनी आफ्रिकेचे २३ दौरे केले. भारताच्या परराष्ट्र धोरणात आफ्रिकेला वर प्राधान्य देण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले. 

रवांडा आणि युगांडा दौऱ्यात सुरक्षा आणि कृषि क्षेत्रात सहकार्य ही पंतप्रधानांची प्राथमिकता असणार आहे. यानंतर ते ब्रिक्स (ब्राझील, रुस, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) च्या शिखर संम्मेलनात सहभागी होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत जाणार आहेत. मोदींचा आफ्रिकेतील हा दुसरा दौरा असेल. याआधी २०१६ मध्ये मोजाम्बिक, दक्षिण आफ्रिका, तंजानिया आणि केनिया दौऱ्यावर होते. पंतप्रधान २३ जुलै ला रवांडा पोहोचतील.

पहिलाच पंतप्रधान दौरा 

 भारताचा पंतप्रधान रवांडा दौऱ्यावर जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारताने रवांडासोबत आपले नाते घट्ट केलंय. भारताने रवांडाला ४० कोटी डॉलरचे कर्ज दिलं असून तिथे भारताकडुन प्रशिक्षण छात्रवृत्ती कार्यक्रम चालविले जात असल्याचे परराष्ट्र मंत्रालय सचिव (आर्थिक) टी.एस.तिरुमुर्ती यांनी सांगितले. 

दोन करारावर स्वाक्षऱ्या 

पंतप्रधानांच्या या दौऱ्यादरम्यान दोन करारांवर स्वाक्षऱ्या होणार असल्याचे अपेक्षा आहे.   औद्योगिक पार्कसाठी १० कोटी डॉलर आणि तेवढीच रक्कम कृषि आमि संचन परियोजनेसाठी दिली जाणार आहे.

Read More