Marathi News> भारत
Advertisement

मनमोहन सिंग ८७ वर्षांचे, पंतप्रधान मोदींनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा आज वाढदिवस असून ते ८७ वर्षांचे झाले आहेत.

मनमोहन सिंग ८७ वर्षांचे, पंतप्रधान मोदींनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा आज वाढदिवस असून ते ८७ वर्षांचे झाले आहेत. त्यांच्या या जन्मदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त अनेक दिग्गज नेते मनमोहन सिंग यांना शुभेच्छा देत आहेत. मनमोहन सिंह यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ ला अविभाजित भारताच्या पंजाब प्रांतात झाला. २००४ ते २०१४ हा त्यांचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ राहीला.

fallbacks

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांच्या आरोग्य आणि दिर्घायुष्यासाठी मी प्रार्थना करतो असे ट्वीट पंतप्रधान मोदी यांनी अमेरिका दौऱ्या दरम्यान केले. 

२००४ ते २०१४ या कार्यकाळात यूपीए सरकारवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले. पण मनमोहन सिंग यांच्यावर कोणताही डाग उमटला नाही. मनमोहन यांच्यावर न बोलण्याचा आरोप करत अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. पण आपल्या शांत, संयमी स्वभावाने त्यांनी अनेकांची मने जिंकली.

गेले पाच वर्षे ते अनेक मुद्द्यांवरुन मोदी सरकारवर प्रहार करत आहेत. जीएसटी लागू करणे, नोटबंदीची घोषणा, आर्थिक मंदीचा परिणाम असे अनेक मुद्दे त्यांनी लावून धरले आहेत. मनमोहन सिंग यांचा प्रहार मोदी सरकारसाठी आव्हान तयार करत असतो. 

Read More