Marathi News> भारत
Advertisement

अमेरिका भारताला लस देणार? पंतप्रधान मोदी आणि कमला हॅरिस यांची फोनवर चर्चा

पंतप्रधान मोदी आणि कमला हॅरिस यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा केली आहे. 

अमेरिका भारताला लस देणार? पंतप्रधान मोदी आणि कमला हॅरिस यांची फोनवर चर्चा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांच्यात गुरूवारी चर्चा झाली. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा केली आहे. या चर्चेनंतर भारतातील लसींची कमतरता दूर होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी पंतप्रधान मोदी यांना फोन करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या चर्चेनंतर भारतातील लसींचा प्रश्न सुटेल असं सांगण्यात येत आहे. फोनच्या माध्यमातून बोलणं झाल्यानंतर  मोदींनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली.

अमेरिकातून जून अखेर भारताला लस पुरवठा होतोय. तर जगभरात जूनअखेरपर्यंत किमान आठ कोटी लसींचं वाटप अमेरिका करणारय. गुरुवारी याबाबत अमेरिकेनं माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्याशी चर्चा केली, त्यांचे आभार मानले. पंतप्रधान मोदी यांनी याबाबत ट्वीटही केलंय. सध्या मोदींचं ट्विट तुफान व्हायरल होत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट करत म्हणाले, 'काही वेळापूर्वीचं कमला  हॅरिस यांच्यासोबत चर्चा झाली. जगभरात लसींचा पुरवठा करण्याचं अमेरिकेने जाहीर केलं आहे. त्यामुळे मी त्यांचं कौतुक करतो. त्याचप्रमाणे अमेरिकन सरकार, व्यवसायिक, उद्योजक आणि प्रवासी भारतीयांनी मिळालेल्या सहकार्याबद्दल मी आभार मानतो.'

अमेरिकेचे राष्ट्रअध्यक्ष जो बायडेन यांनी जाहीर केले आहे की अमेरिका भारतासह आशियाच्या बर्‍याच देशांना लसींचा पुरवठा करणार असल्याचं जाहीर केलं आहे. भारत व्यतिरिक्त आशिया खंडातील नेपाळ, बांग्लादेश, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान, मालदीव, मलेशिया, फिलीपिन्स, व्हिएतनाम, इंडोनेशिया, थायलंड, लाओस, पापुआ न्यू गिनी आणि तैवान या देशांमध्ये लस देण्यात येणार आहे.

Read More