Marathi News> भारत
Advertisement

PM Modi Birthday today | मोदीसुद्धा टॅक्स बचत करण्यासाठी या योजनेत करतात गुंतवणूक; तुम्हालाही घेता येईल फायदा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आर्थिक नियोजनदेखील काटेकोर आणि शानदार आहे. त्यांनीसुद्धा अशा काही योजनांमध्ये पैसे गुंतवले आहेत. जेणेकरून चांगला परतावा तर मिळतोच परंतु सोबतच टॅक्सचीही बचत होते.

PM Modi Birthday today | मोदीसुद्धा टॅक्स बचत करण्यासाठी या योजनेत करतात गुंतवणूक; तुम्हालाही घेता येईल फायदा

मुंबई : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM NARENDRA MODI)यांचा जन्मदिवस आहे. मोदी राजकारणातील दिग्गज व्यक्ती आहेत. तसेच त्यांचे मनी मॅनॅजमेंट देखील शानदार आहे. बचतीचे गुंतवणूक करताना टॅक्स सेविंगकचेही ते नियोजन करतात. पीएम मोदी यांनी काही पैसे अशा योजनांमध्ये गुंतवले आहेत, की जेथे चांगला परतावा तर मिळतोच आहे परंतु सोबतच टॅक्सचीदेखील बचत होत आहे. 31 मार्च 2021 पर्यंत घोषित केलेली संपत्ती नुसार, त्यांनी आपले पैसे टॅक्स सेविंग बॉन्ड, बॅंक एफडी आणि पोस्टाच्या नॅशनल सेविंग्स स्किम सर्टिफिकेट (POST OFFICE NSE)मध्ये गुंतवणूक केली आहे. या तिन्ही योजना टॅक्स बचतीसाठी उत्तम आहेत.

FD ची वॅल्यू
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फेवरेट बचत योजनांमद्ये बँकेची फिक्स्ड डिपॉजिट योजना आहे. गांधीनगर स्थित एसबीआयच्या एका शाखेत 31 मार्च 2021 पर्यंत त्यांच्या FDची वॅल्यू 1 कोटी 83 लाख 66 हजार 966 रुपये इतकी होती.

टॅक्स सूट
5 वर्षाच्या फिक्स्ड डिपॉजिटमध्ये केले गेलेल्या गुंतवणूकीवर इनकम टॅक्स ऍक्ट सेक्शन 80 सी अंतर्गत तुम्ही टॅक्स सूट मिळण्यासाठी क्लेम करू शकता. यात गुंतवणूक करून तुम्ही एका आर्थिक वर्षात कमाल 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या टॅक्सवर सूट क्लेम करू शकता.

टॅक्स सेविंग बॉन्ड
टॅक्स सेविंग बॉन्डमध्ये गुंतवणूक केल्यानंतर इनकम टॅक्स ऍक्टच्या सेक्शन 80 सी सी एफ अंतर्गत टॅक्स बचतीचा लाभ घेता येतो. 

पोस्ट ऑफिस NSE
पोस्ट ऑफिसची प्रसिद्ध टॅक्स सेविंग स्किम नॅशनल सेविंग्स सर्टिफिकेटचा अनेक गुंतवणूकदार उपयोग करतात. NSE मध्ये मोदी यांची 31 मार्च 2021 पर्यंत बचत वॅल्यू 8 लाख 93 हजार इतकी होती. या स्किमअंतर्गत एका आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंत टॅक्स बचतीसाठी क्लेम करता येतो.

Read More