Marathi News> भारत
Advertisement

Modi 3.0 : मोदी सरकार आणखी एक मास्टर स्ट्रोक मारण्याच्या तयारीत; वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी

PM Modi : सरकारची सूत्र हाती घेतल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृतत्वाखालील सरकारनं आणखी एका निर्णयाच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

Modi 3.0 : मोदी सरकार आणखी एक मास्टर स्ट्रोक मारण्याच्या तयारीत; वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी

PM Modi cabinate decison  : सत्तास्थापनेनंतर पंतप्रधानपदी असणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी पहिला निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीनं घेत एका मोठ्या वर्गाला दिलासा दिला. ज्यानंतर आता नव्या निर्णयांच्या दिशेनं मोदी सरकार वाटचाल करताना दिसत आहे. प्राथमिक माहितीनुसार मोदी सरकारच्या या 3.0 टर्ममध्ये वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांचा प्रवास आणखी सुखकर होताना दिसणार आहे. 

कोणत्या निर्णयाच्या दिशेनं चाललंय मोदी सरकार? 

वाहनांवर फास्टॅगची सुविधा लागू झाल्यानंतर टोलनाक्यांवरील गर्दी आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा कमी होती अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. पण, प्रत्यक्षात मात्र तसं होऊ शकलेलं नाही. कारण, फास्टॅगची सुविधा असूनही अनेक टोलनाक्यांवर वाहनांना लांब रांगा लावाव्याच लागतात. आता मात्र ही समस्याही दूर होणार आहे. 

NHAI च्या वतीनं अशा एका यंत्रणेवर काम सुरु आहे, जिथं तुम्हाला टोलनाक्यांवर अधिक वेळ रांगेत उभं राहावं लागणार नाही. राष्ट्रीय महामार्गांवरून ये-जा करणाऱ्या वाहनांना 'बॅरिअर फ्री टोलिंग'चा अनुभव देण्यासाठी आणि टोल वसुलीणध्ये पारदर्शकता आणण्यासाठी म्हणून NHAI कडून जागतिक स्तरावर पावलं उचलली जात आहेत. 

NHAI शी संलग्न असणारी IHMCL ही कंपनी सध्या काही जागतिक स्तरावरील कंपन्यांना ग्लोबल एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट (EOI) साठी आमंत्रित करताना दिसत आहे. सध्या भारताकडून एका अशा कंपनीचा शोध घेतला जात आहे, जिथं GNSS वर आधारित इलेक्ट्रॉनिक टोल कनेक्शन सिस्टीम सुरु करण्यावर भर दिला जाईल. 

टोलनाक्यांवरील अडथळे होणार दूर? 

Satellite Based Tolling System यंत्रणा लागू झाल्यानंतर टोलनाक्यावर कोणत्याही पद्धतीचे अडथळे दिसणार नाहीत. येत्या काळात भारतातही स्वयंचलित पद्धतीनं टोलवसुली होणारी यंत्रणा लागू करण्यात येणार असून, ती ग्लोबल नेविगेशन सॅटेलाइट सिस्टम (GNSS) वर आधारित असेल. फास्टॅगला जोडूनच ही नवी प्रणाली तयार करण्यावर NHAI कडून भर दिला जात असल्याचं कळत आहे. 

हेसुद्धा वाचा : बापरे! 'या' नावाजलेल्या कंपनीकडून 3500 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता; नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना....

 

यंत्रणा नेमकं काम कसं करणार? 

ग्लोबल नेविगेशन सॅटेलाइट सिस्टम (GNSS)वर आधारित ही यंत्रणा सुरुवातील दोन्ही पद्धतींनी काम करेल. म्हणजेच ज्या वाहनांवर फास्टॅग आहे, तेसुद्धा सुरू राहणार असून, नवी GNSS प्रणालीसुद्धा वापरात आणली जाणार आहे. फक्त GNSS प्रणाली सुरु असणाऱ्या वाहनांनी टोलनाक्यांवरील रांग वेगळी असेल, ज्या वाहनांना टोलवसुलीसाठी रांगेत उभं राहावं लागणार नाहीय. जसजशी टोलवसुलीची ही नवी पद्धत यशस्वीरित्या वापरात आणली जाईल, तसतशी टोलवसुलीची जुनी पद्धत पूर्णपणे संपुष्टात येऊन वाहन धारकांना लांबच लांब रांगांमध्ये उभं राहावं लागणार नाहीय. परिणामी देशाच्या महामार्गांवरून सुरु असणारी वाहतूक आणखी चांगल्या पद्धतीनं होणार असून, तुम्ही जितक्या किमी अंतरापर्यंत वाहन चालवलं आहे त्यासाठीचीच टोल रक्कम वसून करण्यात येणार आहे. आहे की नाही ही कमाल बाब? 

Read More