Marathi News> भारत
Advertisement

PM Modi Speech in Lok Sabha: पंतप्रधानांसमोर 'अदानी सरकार'च्या घोषणा, भाजप खासदारांकडून "मोदी मोदी मोदी..."

PM Modi Speech In lok sabha: विरोधकांनी ईडीचे आभार मानावे. ईडीमुळे ते एकत्र आले. काँग्रेसच्या नष्ट होण्यावर जगातील विद्यापिठात अभ्यास केल्या जाईल, असा टोला मोदींनी विरोधकांनी लगावला.

PM Modi Speech in Lok Sabha: पंतप्रधानांसमोर 'अदानी सरकार'च्या घोषणा, भाजप खासदारांकडून

PM Modi Speech in Parliament : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील चर्चेला आज लोकसभेत (Loksabha) उत्तर दिलं. त्यावेळी त्यांनी विरोधकांसह काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना धारेवर धरलं आणि टोलेबाजी केली. काही लोकांच्या भाषणातून त्यांची योग्यता समजते, असा टोला नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधलाय. त्यावेळी सभागृहात गदारोळ झाल्याचं पहायला मिळालं. 

नेमकं काय झालं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान विरोधकांनी प्रचंड  गोंधळ घातला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी 'अदानी सरकार' अशा घोषणा दिल्या. स्पीकर ओम बिर्ला यांनी गोंधळ घालणाऱ्या विरोधी सदस्यांना रोखले आणि सभागृह नेत्याच्या भाषणादरम्यान असे वागणे योग्य नसल्याचे सांगितले. यानंतर गोंधळात पंतप्रधान मोदींनी आपले भाषण सुरुच ठेवले. यानंतर 'मोदी मोदी' अशा घोषणा देण्यात आल्या. तर दुसरीकडे विरोधक 'अदानी अदानी' अशा घोषणा देत होते.

आणखी वाचा - PM Narendra Modi : दिल को बेहला रहे है... शेरो शायरीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राहुल गांधी यांच्यावर निशाणा

अनेकांनी आपली मतं येथं मांडली, असं म्हणत मोदींनी राहुल गांधींना टार्गेट करण्यास सुरूवात केली. प्रत्येकाचं बोलणं ऐकताना हेही ध्यानात येतं की कोणाकडे किती क्षमता आहे, ते किती समजूतदार आहेत आणि कोणाचा हेतू काय आहे. काही लोकांच्या भाषणानंतर इकोसिस्टम उसळत होती. त्याचे समर्थक उड्या मारत होते, असं म्हणत मोदींनी सभागृह दणादूण सोडलं.

दरम्यान, विरोधकांनी ईडीचे आभार मानावे. ईडीमुळे ते एकत्र आले. काँग्रेसच्या नष्ट होण्यावर जगातील विद्यापिठात अभ्यास केल्या जाईल, असा टोला मोदींनी विरोधकांनी लगावला. त्यावेळी टूजी आणि कॉमनवेल्थ घोटाळ्यावरुन नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. यानंतर विरोधकांनी सभागृहाचा त्याग केला.

Read More