Marathi News> भारत
Advertisement

संसदेत घुसखोरी करणाऱ्यांना विरोधकांचं समर्थन? PM मोदींच्या विधानाने खळबळ

PM Modi Criticises Opposition Over Security Breach: भाजपाच्या संसदीय दलाच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना लक्ष्य केलं. पंतप्रधानांनी विरोधकांवर त्यांच्या वर्तवणुकीवरुन टीका केली.

संसदेत घुसखोरी करणाऱ्यांना विरोधकांचं समर्थन? PM मोदींच्या विधानाने खळबळ

PM Modi Criticises Opposition Over Security Breach: संसदेच्या सुरक्षेला भेदून थेट मुख्य हॉलमध्ये तरुणांनी प्रवेश केल्याच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशाचत भारतीय जनता पार्टीच्या संसदीय दलाच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. संसदेच्या सुरक्षेमध्ये झालेल्या चुकीसंदर्भात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, संसदेची सुरक्षा भेदणाऱ्यांना विरोधी पक्षाच्या लोकांचं समर्थन आहे असं वाटतंय अशी प्रतिक्रिया दिली आहे. सूत्रांनी ही महिती दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्षाच्या खासदारांची वर्तवणूक फारच खेदजनक आहे असंही म्हटलं. त्यांच्या वागण्यावरुन असं वाटतंय की संसदेची सुरक्षा भेदणाऱ्यांना विरोक्षी पक्षाचं समर्थन होतं, असंही मोदी म्हणाले.

...तर रिकाम्या जागाही भरतील

भाजपाच्या संसदीय दलाच्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींनी विरोधकांना लक्ष्य केलं. नव्या मतदारांनी तो काळ पाहिला नसेल जेव्हा रोज नवीन घोटाळा समोर यायचा, असं म्हटलं. आपल्याला विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्यांच्या कारनामन्यांबद्दल पुन्हा आठवण करुन देत जागृक करण्याची गरज आहे, असं पंतप्रधान म्हणाले. विरोधकांनी असं वागायचं ठरवलं असेल आणि त्यांना पुढे जायचं नसेल तर इथे ज्या जागा रिकाम्या दिसत आहेत त्या सुद्धा भरलेल्या असतील, असं पंतप्रधान मोदींनी हॉलमधील रिकाम्या खुर्चांकडे पाहत म्हटलं. 

घडलेल्या घटनेच्या मुळाशी जाणं महत्त्वाचं

यापूर्वी पंतप्रधान मोदींनी संसदेच्या सुरक्षेला भेदून आतमध्ये काही तरुणांनी प्रवेश करण्याचा प्रकार आणि सुरक्षेत झालेला गोंधळ हा फारच खेदजनक आणि चिंतेत टाकणारा असल्याचं म्हटलं होतं. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदींनी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे संसदेची सुरक्षा अभेद्य करण्यासाठी आणि संसद अधिक सुरक्षित करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलत आहेत असं म्हटलेलं. तसेच संसदेच्या सुरक्षेमध्ये झालेली चूक आणि त्यासंदर्भातील गोंधळावरुन सभागृहात गोंधळ घालण्याऐवजी हे असं का झालं त्याच्या तळापार्यंत जाणं गरजेचं आहे. तपास यंत्रणा या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. या प्रकरणामध्ये कोण लोक आहेत. त्यांचा हेतू काय होता याबद्दल सखोलपणे जाणून घेणं महत्त्वाचं आहे, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले होते. 

92 खासदार निलंबित

संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये दिवसभराच्या गदारोळानंतर झालेल्या अभूतपूर्व कारवाईमध्ये सोमवारी लोकसभेतील 33 आणि राज्यसभेतील 45 अशा विरोधी पक्षातील एकूण 78 खासदारांना निलंबित करण्यात आले. या कारावाईमुळे कारवाई करण्यात आलेल्या 'इंडिया' आघाडीतील खासदारांची संख्या 92 वर पोहोचली आहे. सभागृहातील कामकाजामध्ये विरोधी खासदारांनी प्रक्रिया नियमांचा भंग केला आहे. तसेच त्यांचे वर्तन अथ्यंत आक्षेपार्ह व असल्य अशल्याची कारणे देत लोकसभेमध्ये संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी तर राज्यसभेमध्ये सभागृह नेते पीयुष गोयल यांनी विरोधी खासदारांच्या निलंबानाचे प्रस्ताव मांडले. हे प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले.  

Read More