Marathi News> भारत
Advertisement

UNSC बैठकीच्या अध्यक्षपदाचा मान मिळवणारे PM मोदी पहिले भारतीय पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी युनायटेड नेशन सेक्युरिटी कॉउंसिलच्या बैठकीची अध्यक्षता करणार आहेत. ते असे करणारे एकमेव आणि पहिले भारतीय पंतप्रधान असणार आहेत.

UNSC बैठकीच्या अध्यक्षपदाचा मान मिळवणारे PM मोदी पहिले भारतीय पंतप्रधान

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी युनायटेड नेशन सेक्युरिटी कॉउंसिलच्या बैठकीची अध्यक्षता करणार आहेत. ते असे करणारे एकमेव आणि पहिले भारतीय पंतप्रधान असणार आहेत. गेल्या 75 वर्षात असे पहिल्यांदा होत आहे की, भारताचे पंतप्रधान युनायटेड नेशन सेक्युरिटी कॉउंसिलची अध्यक्षता करतील. 

भारताचे माजी राजदूत सैय्यद अकबरुद्दीन यांनी म्हटले की, युनायटेड नेशन सेक्युरिटी कॉउंसिलची अध्यक्षता करणे म्हणजेच भारतीय राजकीय नेतृत्वाचा गौरव आहे. भारत या कॉउंसिलच्या बैठकीत समुद्र किनाऱ्यांची सुरक्षा, शांतता, तसेच कॉउंटर टेररिझमच्या मुद्द्यांना प्रामुख्याने मांडणार आहे.

भारताचे माजी पंतप्रधान पीवी नरसिंहराव यांनी भारताचे प्रतिनिधी म्हणून पीवी नरसिंहराव UNSCच्या बैठकीत भाग घेतला होता. 

UNSCची अध्यक्षता भारताला आज (1 ऑगस्ट) मिळाली आहे. याआधी अध्यक्ष फ्रांस होता.

संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे राजदूत टीएस तिरूमुर्ती यांनी फ्रांसला धन्यवाद दिले आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताला समर्थन दिल्याने फ्रांसचे आभार मानले आहेत.

भारत वर्ष 2021 आणि 2022 साठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थाई सदस्य आहे. सोमवारी भारताचे राजदूत टीएस तिरूमुर्ती संयुक्त राष्ट्रांच्या हेडक्वार्टरमध्ये एक पत्रकार परिषद घेणार आहे.

Read More