Marathi News> भारत
Advertisement

तब्बल 6 कोटी PF खातेधारकांना 'या' एका निर्णयामुळं होणार मोठा फायदा; लग्न, घर, शिक्षणासाठी...

EPFO Latest Update : तुम्हीही आहात का याचे लाभार्थी? लग्न, घर, शिक्षणासोबतच अगदी आजारपणासाठीसुद्धा महत्त्वाची तरतूद, पाहा काय आहे हा निर्णय...   

तब्बल 6 कोटी PF खातेधारकांना 'या' एका निर्णयामुळं होणार मोठा फायदा; लग्न, घर, शिक्षणासाठी...

Auto Claim Settlement Facility: नोकरदार (Job) वर्गाला हातात येणाऱ्या पगारासोबतच आणखी एका गोष्टीची सतत काळजी असते, ती गोष्ट म्हणजे निवृत्तीवेतन आणि पीएफ खात्याची. याच नोकरदार वर्गाला केंद्रस्थानी ठेवत देशात एक नवी सुविधा लागू करण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत शिक्षण, लग्न आणि घरापासून अगदी आजारपणाच्या काळात लागणाऱ्या आर्थिक मदतीसाठी आता तातडीनं पैशांची उपलब्धता करून दिली जाणार आहे. EPFO कडून ही सुविधा नोकरदारवर्गासाठी सेवेत हजर असेल. जिथं संगणकीय पद्धतीनं क्लेम तपासून त्याला तातडीनं मंजुरी दिली जाणार आहे. 

आतापर्यंत फक्त आजारपणाच्याच बाबतीच ही सुविधा लागू होती. पण, आता मात्र (Education, Marriage, house) शिक्षण, लग्न आणि घराच्या कारणासाठी साधारण 6 कोटींहून अधिक ईपीएफओ खातेधारकांना याचा फायदा मिळणार आहे. EPFO कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार यामध्ये आर्थिक मर्यादा 50 हजार रुपयांहून थेट दुपटीनं वाढवण्यात आली आहे. अर्थात ही मर्यादा आता 1 लाख रुपयांवर पोहोचली आहे. 

अधिकृत माहितीनुसार 2023-24 च्या आर्थिक वर्षादरम्यान EPFO नं जवळपास 4.45 कोटी क्लेमना परवानगी दिली. यामध्ये 60 टक्क्यांहून अधिक म्हणजेच 2.84 कोटी क्लेम आजारपण, शिक्षण आणि लग्नासाठीच्या कारणानं पैसे काढण्यासाठीचे होते. थोडक्यात तुम्ही आता पीएफ खात्यातून शिक्षण, घर आणि लग्नाच्या कामासाठी आर्थिक हातभार म्हणून 1 लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकता. 

हेसुद्धा वाचा : जगातील सर्वात मोठं ट्रॅफिक जॅम; तब्बल 12 दिवस वाहनं एकाच जागी उभी, काय होतं कारण? 

ईपीएफओकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत जितके अॅडवांस क्लेम करण्यात आले होते त्यापैकी जवळपास 90 लाख क्लेम ऑटो सेटल करण्यात आले. ज्यामध्ये नव्या कार्यप्रणालीनुसार संगणकाच्या मदतीनं ही प्रक्रिया पार पडली. ज्यामुळं अॅडवांस क्लेमसाठीचा कालावधीही कमी होऊन जिथं आधी या कामासाठी 10 दिवसांचा कालावधी लागत होता तिथंच आता अवघे 3 ते 4 दिवस लागत आहेत. 

दरम्यान संगणकाच्या माध्यमातून कोणता क्लेम मंजूर झाला नाही, तर तो रद्द केला न जाता अशा क्लेमची पुन्हा पडताळणी होऊन त्याला नव्यानं मंजुरी दिली जाते. 6 मे 2024 पासून ही नवी प्रणाली अंमलात आणण्यास सुरुवात झाली असून, आतापर्यंत 13,011 खातेधारकांना याचा फायदा मिळाला आहे. ज्यामध्ये 45.95 कोटी रुपयांची देय रक्कम मंजूर करण्यात आली आहे. 

Read More