Marathi News> भारत
Advertisement

पीएफधारकांनो हे काम आत्ताच उरकून टाका, कुटुंबियांना मिळतील इतके लाख रुपये

 पीएफओकडून पीएफधारकांसाठी (EPFO) नवी सेवा सुरु करण्यात आली आहे. 

पीएफधारकांनो हे काम आत्ताच उरकून टाका, कुटुंबियांना मिळतील इतके लाख रुपये

मुंबई : पीएफधारकांसाठी (PF Holder) अतिशय महत्त्वाची बातमी आहे. पीएफओकडून पीएफधारकांसाठी (EPFO) नवी सेवा सुरु करण्यात आली आहे. ई-नामांकन असं या नव्या सेवेचं नाव आहे. याबाबतची माहिती पीएफओने अधिकृत वेबसाईटवर दिली आहे. नक्की EPFO मध्ये ई नॉमिनेशन कसं करायचं हे जाणून घेण्याआधी याचा नेमका फायदा काय असतो, हे आपण जाणून घेऊयात. (PF account holders to file e nomination immediately family will get benefit of Rs 7 lakh)

का महत्त्वाचं आहे EPFO ई नॉमिनेशन?

ईपीएफओने एक परिपत्रक प्रसिद्ध केलंय. त्यानुसार सर्व पीएफधारकांना ई नॉमिनेशन भरावं लागणार आहे. एखाद्या पेचप्रसंगात याचा फायदा हा पीएफधारकाच्या कुटुंबियांना मिळेल. तसेच पीएफधारकाने ई नॉमिनेशनमध्ये नोंदणी केल्यास त्याच्या कुटुंबियांना 7 लाख रुपये मिळतील.  

EPFO ई नॉमिनेशनचे फायदे

पीएफधारकाचा मृत्यू झाल्यास सहजपणे पीएफ, निवृत्तीवेतन आणि विम्याचा लाभ मिळेल. ई नॉमिनेशनमुळे पीएफधारकाच्या उत्तराधिकाऱ्याला ही सर्व रक्कम मिळवण्यासाठी ऑनलाईन क्लेम करावं लागेल. जे ई नॉमिनेशनमुळे केल्याने उत्तराधिकाऱ्याला ऑनलाईन क्लेम फाईल करण्याची सुविधा मिळेल. 

ई नॉमिनेशन करण्यासाठी काय करावं लागणार? 

ई नॉमिनेशनसाठी पीएफधारकाला कुठेही जाण्याची गरज नाही. ही सर्व सोपस्कार पीएफधारक ऑनलाईनही करु शकतात. यासाठी https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. त्यानंतर लॉगीन करावं लागेल. पीएफधारकाने नॉमिनेशन केलं नसेल तर एक अलर्ट येईल.  

यानंतर Manage टॅबवर गेल्यानंतर  e-nomination हा पर्याय सिलेक्ट करावा लागेल. इथे पीएफधारकाला कुटुंबाबातची माहिती द्यावी लागेल. तुमचं कुटुंब आहे की नाही, हे ही विचारलं जाईल. याचं उत्तर हो किंवा नाहीमध्ये द्यावं लागेल. तसेच ज्याला नॉमिनी ठेवायचं आहे, त्याची माहितीही द्यावी लागेल. यामध्ये उत्तराधिकाऱ्याचं नाव, जन्मतारीख, पीएफधारकासोबतचे नातं, पत्ता, बँक डिटेल्स, यासारखी माहिती द्यावी लागेल. यानंतर Save Family Details यावर क्लिक करा. 

Read More