Marathi News> भारत
Advertisement

PF फॉर्म भरताना तुम्ही केलं ना 'हे' काम, अन्यथा पैसे अडकतील...

PF Balance : जर तुम्ही PF फॉर्म भरताना काळजी घेतली नाही, तर तुमचे पैसे अडकू शकतात. 

PF फॉर्म भरताना तुम्ही केलं ना 'हे' काम, अन्यथा पैसे अडकतील...

EPFO : आता बातमी आहे पीएफ खातेधारकांसाठी...जर तुम्ही PF फॉर्म भरताना काळजी घेतली नाही, तर तुमचे पैसे अडकू शकतात. कारण एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) ने आता PF खातेधारकाला नॉमिनी निवडणे अनिवार्य केलं आहे. ज्या सदस्यांनी आतापर्यंत हे काम केलेलं नाही त्यांनी त्वरित हे काम करावे. जर हे काम तुम्ही केलं नाही तर तर ईपीएफओने तुम्हाला काही सुविधांपासून वंचित ठेवले आहे. 

जर तुम्ही नॉमिनी निवडला नसेल तर तुम्हाला ऑनलाइन जमा रक्कम तपासता येणार नाही. म्हणून लगेचच तुम्ही हे काम करुन घ्या. पीएफ खात्यासाठी ई-नॉमिनेशन करणे अवघड काम नाही. (pf account holders news nm)

पीएफ खातेधारकाच्या मृत्यूनंतर, खातेदाराची पीएफची रक्कम नॉमिनीला मिळते. शिवाय जर एखाद्या पीएफ ग्राहकाचा मृत्यू झाला तर ई-नॉमिनेशन केल्यावरच भविष्य निर्वाह निधी, पेन्शन, विम्याचे फायदे ऑनलाइन क्लेम आणि सेटलमेंट शक्य आहे. ई-नॉमिनेशनसाठी खातेदाराकडे सक्रिय UAN आणि मोबाईल नंबर आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. खातेदार घरी बसून ई-नॉमिनेशन ऑनलाइनही करू शकतात. जर एखाद्या पीएफ खातेधारकाचा नॉमिनी न करता मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबीयांना पीएफचे पैसे मिळण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. 

ऑनलाइन ई-नामांकनाची पद्धत (Online e-Nomination)

EPFO च्या अधिकृत वेबसाइट epfindia.gov.in वर लॉग इन करा.
'सेवा' टॅबमध्ये, ड्रॉप-डाउन मेनूमधून 'कर्मचाऱ्यांसाठी' टॅबवर क्लिक करा.
आता तुमच्या UAN ने लॉग इन करा.
मॅनेज टॅब दिसेल. यामध्ये ई-नामांकन निवडा.
आता तुमचा कायम आणि वर्तमान पत्ता प्रविष्ट करा.
कुटुंब घोषणा बदलण्यासाठी, होय निवडा.
नामनिर्देशित तपशील प्रविष्ट करा आणि सेव्ह वर क्लिक करा.
आता ई-चिन्हावर क्लिक करून पुढे जा.
तुमचा आधार क्रमांक एंटर करा आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला OTP देखील भरा.
ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, आता तुमचे नामांकन अपडेट केले जाईल.

Read More