Marathi News> भारत
Advertisement

Petrol-Diesel Price : गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी पेट्रोल-डिझेलचा आजचा दर किती? जाणून घ्या...

Petrol-Diesel Price Today : ऑफीसला जाण्यापूर्वी अनेकांना पेट्रोलपंपावर जाऊन गाडीत पेट्रोल किंवा डिझेल भरण्याची घाई असते. तुम्ही पण गाडीची टाकी फुल्ल करण्याचा विचार करत असाल तर आधी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर नक्की तपासा...

Petrol-Diesel Price : गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी पेट्रोल-डिझेलचा आजचा दर किती? जाणून घ्या...

Petrol-Diesel Price on 19th April 2023 : गेल्या अनेक महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price) दरात सातत्याने चढ-उतार होत आहे. त्यामुळे देशातील करोडो कार आणि दुचाकी चालक वाढत्या किमतीमुळे त्रस्त आहेत. मात्र आज राष्ट्रीय तेल कंपन्यांनी गाडी चालकांसाठी दिलासा देणारी माहिती दिली आहे. दरम्यान राष्ट्रीय तेल कंपन्यांनी आज (19 एप्रिल) जाहिर केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहेत.

पेट्रोल-डिझेलचे दर जरी स्थिर असले तरी ब्रेंट क्रूड तेलाचा दर आज प्रति बॅरल $ 85.04 आहे. तर WTI कच्च्या तेलाच्या किमतीत प्रति बॅरल $ 81.11 वर पोहोचली आहे. कच्चा तेलाच्या वाढत्या किमतीचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरावर दिसून येतो. 

जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

आज देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये तर डिझेल 89.62 रुपयांनी विकले जाणार आहे. तर आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये तर डिझेल 94.27 रुपये आहे. त्याचबरोबर चेन्नईमध्ये 102.63 रुपये पेट्रोल आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लीटर आहे. त्याचवेळी कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 106.03 रुपये आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे. 

सर्वात महाग पेट्रोल

तर आंध्र प्रदेशात सर्वात महाग पेट्रोल विकले जाणार असून एक लिटरसाठी ग्राहकांना 111.76 रुपये मोजावे लागणार आहेत. तर केंद्रशासित प्रदेश अंदमान आणि निकोबारमध्ये सर्वात कमी किंमत म्हणजेच पेट्रोल 84.10 रुपयांनी विकले जाईल. हैदराबादमध्ये पेट्रोलचा दर 109.66 रुपये तर उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये 96.57 रुपये आहे. पेट्रोल डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. एसएमएसद्वारे तुम्ही घरबसल्या दर तपासू शकता. 

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर 

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

घरबसल्या चेक करा नवे  दर 

तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात.  त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. 

Read More