Marathi News> भारत
Advertisement

कच्च्या तेलाच्या किमतीत थोडीशी घसरण; जाणून घ्या पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर

Petrol-Diesel Price : देशभरात बुधवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत निश्चित केली जाते.

कच्च्या तेलाच्या किमतीत थोडीशी घसरण; जाणून घ्या पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर

Petrol-Diesel Price Today 16 August 2023: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत थोडीशी घसरण झाली आहे. ब्रेंट क्रूड तेल प्रति बॅरल 85 डॉलरच्या खाली आले आहे. भारतीय पेट्रोल-डिझेल बाजाराचा विचार केला तर आजही दरात कोणताही बदल झालेला नाही. 497व्या दिवशीसुद्धा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Price) कोणताही बदल झालेला नाही. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बुधवारीही कोणताही बदल केला नाही. या कंपन्यांनी 6 एप्रिल 2022 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत 80-80 पैशांनी शेवटी वाढ केली होती.

आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 84.69 डॉलर आहे. तसेच डब्लूटीआय कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 80.77 डॉलर आहे. दरम्यान, देशातील अनेक भागांमध्ये पेट्रोलच्या दराने प्रतिलिटर 100 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे, तर डिझेलचा दरही बहुतांश ठिकाणी 90 रुपयांपेक्षा जास्त आहे.

बुधवारी दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये आणि डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटर राहिला.मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दराने विकले जा आहे.तसेच चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लीटर दराने उपलब्ध आहे. याशिवाय कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

तर झारखंडमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण झाली आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ आणि वाराणसी, प्रयागराज, बरेली, आग्रा, गोरखपूर आणि कानपूरसह इतर प्रमुख शहरांमध्ये तेलाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये पेट्रोल 25 पैशांनी तर डिझेल 24 पैशांनी महागलं आहे. राजस्थानमध्ये पेट्रोल 24 पैशांनी तर डिझेल 22 पैशांनी वाढले आहे. बिहारमध्येही पेट्रोल 33 पैशांनी तर डिझेल 31 पैशांनी महागलं आहे.

Read More