Marathi News> भारत
Advertisement

खुशखबर : एवढ्या रुपयांनी स्वस्त होऊ शकतं पेट्रोल-डिझेल

तब्बल ७ महिन्यांनंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये कपात होण्याची शक्यता आहे.

खुशखबर : एवढ्या रुपयांनी स्वस्त होऊ शकतं पेट्रोल-डिझेल

नवी दिल्ली : तब्बल ७ महिन्यांनंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये कपात होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले होते. मागच्या ७ महिन्यांमध्ये पेट्रोल ९ रुपये महाग झालं. पण आता कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यामुळे पेट्रोल-डिझेलची किंमत २ रुपयांनी कमी होऊ शकते.

येत्या काही दिवसांमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती ६२ डॉलर प्रती डॉलरपर्यंत कमी होऊ शकतात, असं बोललं जातंय. जर असं झालं तर पेट्रोल-डिझेलच्या किंमती ७ महिने जुन्या दरावर पोहोचतील. म्हणजेच या किंमतीमध्ये २ रुपयांची कपात होईल.

२१ पैसे स्वस्त झालं पेट्रोल

मागच्या दोन दिवसांमध्ये पेट्रोल २१ पैसे आणि डिझेल २८ पैशांनी कमी झालं आहे. मुंबईमध्ये पेट्रोल ८०.८७ रुपये तर डिझेल ६७.७५ रुपये प्रती लीटर आहे.

म्हणून कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या

डिसेंबरनंतर कच्च्या तेलाच्या किंमती १० टक्क्यांनी घसरल्या आहेत. अमेरिका तसंच ओपेक देशांनी कच्च्या तेलाचं उत्पादन वाढवलं आहे. तसंच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची मागणी कमी झाली आहे. या सगळ्याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किंमती कमी होण्यात झाली आहे.

महागाईवरही लगाम लागणार

पेट्रोल-डिझेल स्वस्त झालं तर महागाईही कमी होण्याची शक्यता आहे. पेट्रोल-डिझेल महाग झाल्यामुळे कच्चा माल, भाजी, फळं यांच्या वाहतुकीचा खर्च वाढतो. इंधनाच्या किंमती कमी झाल्या तर या सगळ्याचे भाव कमी व्हायला मदत होते. त्यामुळे महागाई नियंत्रणात राहते. 

Read More