Marathi News> भारत
Advertisement

लांबचा प्रवास त्यात ट्रॅफिकमध्ये अडकून पडण्याची भीती? Petrol-Diesel गाडीत भरण्याआधी ताबडतोब जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price: मुंबई-पुणे महामार्गानंतर मुंबई-गोवा महामार्गावरही वाहतूक कोंडी (Traffic Jam) पाहायला मिळाली त्यामुळे काल अनेक प्रवाशांची डोकेदुखी वाढली. त्यामुळे गाडीत पेट्रोल आणि डिझेल असणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात. तेव्हा या लेखातून जाणून घ्या की तुमच्या शहरातील आजचे दर (Latest Price in Maharashtra) काय आहेत? 

लांबचा प्रवास त्यात ट्रॅफिकमध्ये अडकून पडण्याची भीती? Petrol-Diesel गाडीत भरण्याआधी ताबडतोब जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price: महाराष्ट्रात अद्याप तरी इंधनाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली नाही. त्यामुळे सार्वजनिक आणि खाजगी वाहतूक (Petrol Diesel Latest Price) करण्यांसाठी सध्यातरी चिंतेचे वातावरण नाही. ग्राहकांसाठी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये फारशी वाढ नसल्यानं त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु आज तुम्हाला जर का कुठे लॉन्ग ड्राईव्हला अथवा कामाच्या निमित्तानं कुठला तरी लांबचा प्रवास करायचा आहे? त्यातून वाढत्या ट्रॅफिकचीही भिती वाटतेय? तेव्हा गाडीत पेट्रोल भरण्याशिवाय काही पर्याय नाही.

घराबाहेर पडण्यापूर्वी आणि गाडीत इंधन भरण्यासाठी घरबसल्याच आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घेणे आवश्यक आहे. तेव्हा या लेखातून जाणून घ्या तुम्हाला आज पेट्रोल आणि डिझेलसाठी किती पैसे मोजावे लागणार आहेत. गुडरिटर्न्सच्या वेबसाईटनुसार, आज पेट्रोलच्या आणि डिझेलच्या दरात फारशी वाढ (Petrol Diesel Prices Unchanged) नाही. त्यामुळे ग्राहकांना आज मोठा दिलासा आहे. कालच्या एवढेच आजचेही दर आहेत. आज पेट्रोल हे 106.31 रूपये प्रति लीटर असून डिझेल हे 94.27 रूपये प्रति लीटर आहे. अक्षय्य तृतीयेनंतरही या किमती तेवढ्याच आहेत. (Petrol and Diesel price today 30th april 2023 know the latest price today in your city)

महाराष्ट्रात इंधनवाढ?

महाराष्ट्रातील अनेक भागात डिझेलचा वापर हा जास्त होतो, त्यातून मुंबईसारख्या शहरी भागातही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सारखी घसरण यंदाच्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारावरही तितक्याच प्रमाणात नजर ठेवावी लागते कारण कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या तर त्याचा थेट परिणाम हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही होतो. महाराष्ट्रातही वेगवेगळ्या बदलांमुळे विविध शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती या वेगवेगळ्या पाहायला मिळतात. 

काय आहेत तुमच्या शहरातील दर

अकोला येथे पेट्रोलचे दर हे 106.14 रूपये प्रति लीटर आहेत. धुळे जिल्ह्यात हे दर 106.82 रूपये प्रति लीटर इतके आहेत. कोल्हापूरला 107.43 रूपये प्रति लीटर पेट्रोल आहे. नाशिक जिल्ह्यात पेट्रोलचे दर हे 106.51 रूपये इतके आहेत. तर पुण्यात 105.77 रूपये प्रति लीटर दरानं पेट्रोल आहे. ठाण्यात 106.38 रूपये प्रति लीटर पेट्रोल आहे. 

अकोल्यात डिझेल हे 92.69 रूपये प्रति लीटर इतके आहे. तर नागपूर येथे डिझेल हे 92.58 रूपये प्रति लीटर आहे. नाशिकमध्ये डिझेल 93.02 रूपये प्रति लीटर आहे. तर पुण्यात आणि ठाण्यात पेट्रोल हे अनुक्रमे 92.30 रूपये आणि 94.34 रूपये प्रति लीटर इतके आहे. 

Read More