Marathi News> भारत
Advertisement

पेट्रोल-डिझेल सलग नवव्या दिवशी महागलं

कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने पेट्रोल -डिझेल महागलं.

पेट्रोल-डिझेल सलग नवव्या दिवशी महागलं

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलचे दर सलग नवव्या दिवशी ही वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने पेट्रोल -डिझेल महागलं. कच्च्या तेलाच्या दरात वाढ होत असल्याने ऑईल मार्केटिंग कंपन्या पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवत आहेत. या कंपन्यांनी शुक्रवारी दिल्ली आणि चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर 8 पैशांनी तर मुंबई आणि कोलकातामध्ये 7 पैशांनी वाढवले आहेत. डिझेल दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईमध्ये 19 पैशांनी तर मुंबईमध्ये 20 पैशांनी वाढलं आहे.

इंडियन ऑयलच्या वेबसाईटनुसार दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर क्रमश: 70.55 रुपये, 72.65 रुपये, 76.18 रुपये आणि 73.23 रुपये प्रति लीटर झाले आहेत. या चारही मोठ्या शहरांमध्ये डिझेल क्रमश: 64.97 रुपये, 66.74 रुपये, 68.02 रुपये आणि 68.62 रुपये प्रति लीटर झालं आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी कच्च्या तेलाच्या दरामध्ये मोठी वाढ झाली. इंटरकाँटिनेंटल एक्सचेंजवर मार्च डिलीवरी ब्रेंट क्रूडच्या करारानुसार 0.90 टक्के वाढसह 61.73 डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार झाला. या व्यवहारादरम्यान 61.83 डॉलर प्रति बॅरल हा दर सर्वाधिक राहिला. न्यूयार्क मर्केंटाइल एक्सचेंजवर अमेरिकेची लाइट क्रूड वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटने फेब्रुवारीमध्ये 1.13 टक्के वाढ सह 52.77 डॉलर प्रति बॅरलने कच्च तेल खरेदी केलं.

Read More