Marathi News> भारत
Advertisement

पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग अकराव्या दिवशी कपात

पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त

पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग अकराव्या दिवशी कपात

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरत असून याचा काहीसा फायदा भारतीय नागरिकांना होतो आहे. गेल्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेलचे दर वाढत होते. मात्र कच्च्या तेलाच्या घसरणाऱ्या किंमतीमुळे सलग अकराव्या दिवशी कपात झाली आहे.

पेट्रोल 39 पैसे तर डिझेल 35 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे मुंबई पेट्रोलचे दर प्रति लिटर 85.54 रू. तर डिझेलचे दर प्रति लिटर 77.61 इतके असतील. अकरा दिवसात पेट्रोलची किंमत 2.75 तर डिझेलची किंमत 1.74 रुपयांनी कमी झाली आहे.

Read More