Marathi News> भारत
Advertisement

पेट्रोल आणि डिझेल पुन्हा एकदा महागलं

2 महिन्यातील सर्वाधिक स्तरावर

पेट्रोल आणि डिझेल पुन्हा एकदा महागलं

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेल पुन्हा एकदा महागलं आहे. काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये दिलासा मिळाला होता पण सोमवारी पेट्रोलचे भाव वाढले आहेत. 2 महिन्यातील सर्वात जास्त स्तरावर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चं तेल महागल्याने आणि रुपया डॉलरच्या तुलनेत आणखी घसरल्याने तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले आहेत.

4 शहरांमधील पेट्रोलचे दर 

सोमवारी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 76.97 रुपये प्रति लीटर झाला आहे. 9 जूननंतरचा हा सर्वाधिक दर आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचे दर 79.89 रुपये आहे. जो 8 जूननंतरचा सर्वाधिक दर आहे. मुंबईमध्ये पेट्रोल 84.41 रुपये तर चेन्नईमध्ये 79.96 रुपये प्रति लीटर झाला आहे. रविवारच्या तुलनेत सोमवारी दिल्ली, कोलकाता आणि मुंबईमध्ये पेट्रोल 12 पैशांनी तर चेन्नईमध्ये 13 पैशांनी महागलं आहे.

डिझेल ही महागलं

डिझेलचे दर देखील वाढले आहेत. सोमवारी दिल्लीमध्ये डिझेलचे दर 68.44 रुपये, कोलकातामध्ये 71.22 रुपये, मुंबईमध्ये 72.66 रुपये आणि चेन्नईमध्ये 72.29 रुपये झाला आहे.

Read More