Marathi News> भारत
Advertisement

पेट्रोल-डिझेलच्या दरात होणार घसरण, आंतरराष्ट्रीय बाजारात १०% स्वस्त झालं कच्च तेल

पेंट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दरात होणार घसरण, आंतरराष्ट्रीय बाजारात १०% स्वस्त झालं कच्च तेल

नवी दिल्ली : पेंट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दरात झालेली वाढ येत्या आठवड्याभरात कमी होण्याची शक्यता आहे. कारण, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घट झाली आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाल्यामुळे ऑईल मार्केटिंग कंपन्यांचा खर्च कमी झाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आठवड्याभरात १० टक्क्यांनी झाली घट

गेल्या आठवड्याभरात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाच्या किंमतीत १० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली आहे. ब्रेंट क्रूडचा दर गेल्या आठवड्यात ७० डॉलरपेक्षा अधिक होता मात्र, ९ फेब्रवारी रोजी हा दर ६२.७९ डॉलर प्रति बॅलर झाला आहे. तर, WTI क्रूडचा दर २ फेब्रवारी रोजी ६६ डॉलरपेक्षा अधिक होता मात्र, आता हा दर कमी होऊन ५९.२० डॉलरवर पोहोचला आहे.

भारतासाठी कच्चं तेल झालं स्वस्त 

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या झालेल्या घटीमुळे क्रूड ऑईलच्या दरात १० टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. जानेवारी भारताला कच्चं तेल साधारणत: ६७.०७ डॉलर प्रति बॅरलने मिळत होतं. मात्र, आता या दरात घट होऊन ६०-६१ डॉलर प्रति बॅरल झाला आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दरात होणार घट

कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेल्या घटमुळे पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याची अपेक्षा आहे. सध्या राजधानी दिल्लीत पेट्रोल ७३.२२ रुपये, कोलकातामध्ये ७५.९१, मुंबईत ८१.०८ रुपये आणि चेन्नईत ७५.९५ रुपयांना मिळत आहे.

Read More