Marathi News> भारत
Advertisement

Petrol Price Today : महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल महाग, गाडीची टाकी भरण्यापूर्वी तुमच्या शहरातील नवीन दर तपासा

Petrol Diesel Price Today : देशात सकाळी 6 वाजता पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहे. तुमच्या शहरात इंधन महागले की स्वस्त झाले, जाणून घ्या...

Petrol Price Today : महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल महाग, गाडीची टाकी भरण्यापूर्वी तुमच्या शहरातील नवीन दर तपासा

Petrol Diesel Price on 9 May 2023  :  जागतिक बाजारात अमेरिका आणि डॉलरच्या दबावामुळे सर्वच वस्तूंच्या किंमतीत चढउतार होत आहेत. फेडरल रिझर्व्हच्या धोरणाचा हा परिणाम आहे. सोन्या-चांदीसह (Gold and Silver Rate) इंधनाच्या दरात ही उलथापालथा सुरु आहे. आज, 9 मे रोजी WTI क्रूड ऑइल 4.05 टक्क्यांनी वाढले असून याचा परिणाम पेट्रोलच्या किंमतीवरही दिसून येत आहे. सकाळी 6 वाजता देशातील तेल मार्किटिंग कंपनींने पेट्रोल आणि डिझेलचे अपडेटेट दर जाहीर केले आहे. यामध्ये महाराष्ट्रात पेट्रोल 40 पैसे तर डिझेल 39 पैशांनी महाग झाले आहेत. जर तुम्ही गाडीत पेट्रोल किंवा डिझेल भरणार असाल तर तुमच्या शहरातील पेट्रोलचे दर एक नक्की तपासून घ्या... (Petrol and diesel became expensive in Maharashtra)

दरम्यान केंद्र सरकारने 22 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील (Petrol Diesel Price) उत्पादन शुल्क कमी केले. त्यानंतर देशातील भाजपशासित राज्यांनी तोच कित्ता गिरवला. त्यांनी मूल्यवर्धित करात कपात केली. त्यामुळे प्रतिलिटर 10 ते 12 रुपये नफा मिळतो. मात्र गेल्या वर्षभरात इंधनाच्या दरात कोणताही मोठा बदल झालेला नाही.

प्रति लिटर नफा

गेल्या वर्षभरापासून देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol Diesel rate) फारसा फरक पडलेला नाही. तर बाजारात तेलाच्या किमतीत फारसा बदल झालेला नाही. जवळपास 350 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात फारसा फरक झालेला नाही. एका अहवालानुसार, तेल कंपन्यांना प्रति लिटर 10 रुपयांपेक्षा जास्त नफा झाला आहे. 

महाराष्ट्रात पेट्रोल महागले

आज जाहीर झालेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरानुसार दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये दरात बदल नक्कीच आहे. महाराष्ट्रात पेट्रोल 40 पैशांनी तर डिझेल 39 पैशांनी महागले आहे. त्याचबरोबर तामिळनाडूमध्येही पेट्रोल आणि डिझेल 25 पैशांनी महागले आहे. केरळमध्येही पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. तर दुसरीकडे तेलंगणामध्ये पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले आहे. त्याचवेळी, उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किंचित वाढ झाली आहे.

  • मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
  • दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
  • कोलकातामध्ये पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
  • चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर 
Read More