Marathi News> भारत
Advertisement

बिहार हिंसाचारप्रकरणी पटनाचे खान सर अडचणीत; उमेदवारांना चिथावल्याचा आरोप

RRB NTPC निकालाचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. बिहारमध्ये, गेल्या 72 तासांमध्ये, अनेक जिल्ह्यांमध्ये जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक केल्याप्रकरणी राजेंद्र नगर रेल्वे स्टेशनसह तीन पोलीस ठाण्यांमध्ये 2000 हून अधिक लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बिहार हिंसाचारप्रकरणी पटनाचे खान सर अडचणीत; उमेदवारांना चिथावल्याचा आरोप

पटना : RRB NTPC निकालाचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. बिहारमध्ये, गेल्या 72 तासांमध्ये, अनेक जिल्ह्यांमध्ये जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक केल्याप्रकरणी राजेंद्र नगर रेल्वे स्टेशनसह तीन पोलीस ठाण्यांमध्ये 2000 हून अधिक लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पटनावाले खान सरांवर खटला
खान सरांशिवाय एसके झा सर, नवीन सर, अमरनाथ सर, गगन प्रताप सर, गोपाल वर्मा सर आणि बाजार समितीच्या अनेक कोचिंग क्लास चालवणाऱ्यां व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांविरुद्ध भादंवि कलम १४७, १४८, १४९, १५१, १५२, १८६, १८७, १८८, ३३०, ३३२, ३५३, ५०४, ५०६ आणि १२० ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांच्या वक्तव्यावर कारवाई
या प्रकरणी पत्रकार नगर पोलिस ठाण्यात सोमवार आणि मंगळवारी झालेल्या हिंसाचारानंतर ताब्यात घेतलेल्या आंदोलक विद्यार्थ्यांच्या जबाबाच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताब्यात घेतलेल्या आंदोलक उमेदवारांनी असे म्हटले आहे की सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना हिंसाचाराचे प्रोत्साहन मिळाले. या व्हिडीओमध्ये खान सर कथितपणे RRB NTPC परीक्षा रद्द न केल्याबद्दल विद्यार्थ्यांना रस्त्यावर आंदोलन करण्यास सांगत होते.

दरम्यान, खान सरांनी याबाबत खुलासा केला आहे. आरआरबीने आता जो निर्णय घेतला आहे, तो 18 तारखेला घेतला असता, तर ही परिस्थिती उद्भवली नसती, असे वक्तव्य त्यांनी बुधवारी सायंकाळी केले होते.

खान सर कोण?
खान सर हे लोकप्रिय कोचिंग शिक्षक आहेत. जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म YouTube वर खान जीएस रिसर्च सेंटर चालवतात आणि त्यांच्या अनोख्या शिकवण्याच्या शैलीसाठी देखील ओळखले जातात. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत.

हेराफेरीच्या आरोपावरून गदारोळ
नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (NTPC) भर्ती CBT-1 परीक्षेचे निकाल रेल्वे भर्ती बोर्डाने (RRB) 14 आणि 15 जानेवारी 2022 रोजी प्रसिद्ध केले होते. या निकालाच्या आधारे उमेदवारांना CBT-2 म्हणजेच फेज II परीक्षेसाठी निवडले जाणार आहे. RRB-NTPC निकालात हेराफेरी झाल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे.

Read More