Marathi News> भारत
Advertisement

पाटीदार नेते हार्दिक पटेल यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी आज काँग्रसे काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.  

पाटीदार नेते हार्दिक पटेल यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

गांधीनगर : गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी आज काँग्रसे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थित काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यामुळे गुजरातमध्ये काँग्रेसला पाटीदार समाजाचे चांगले पाठबळ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर हार्दिक पटेल यांनी गुजरात सरकारला नाकीनऊ आणले होते. त्यामुळे त्यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे लोकसभेत पक्षाला गतवर्षीपेक्षा यावेळी चांगली कामगिरी करण्याची संधी मिळणार आहे.

fallbacks

हार्दिक पटेल यांनी अधिकृतरित्या काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक झाल्यानंतर जाहीर सभेत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी- वाड्रा यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. हार्दिक पटेल यांची गुजरातमधील युवा पाटीदार नेता अशी ओळख आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ते म्हणालेत, मी काँग्रेसची विचारधारा गावोगाव घेवून जाईन. यावेळी हार्दिक पटेल यांनी महात्मा गांधीजींच्या दांडी यात्रेचा आधार घेतला. गांधीजींनी आजच्या दिवशी मीठाचा सत्याग्रह सुरु करुन मी इंग्रजांची सत्ता उलथवून टाकीन, असे सांगितले होते. आज मी याच काँग्रेसशी जोडला जाणार आहे. याच काँग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहलाल नेहरु, सरदार पटेल, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी भारताला सक्षम बणवण्याचे काम केले आहे, असे ते म्हणालेत.

प्रियंका गांधी यांची युवकांना साद  

दरम्यान, हार्दीक पटेल यांनी लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळणार का, यावर त्यांनी भाष्य टाळले. याबाबत पक्ष काय तो निर्णय घेईल. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बालेकिल्ल्यातून आज काँग्रेसने लोकसभा निवडणुकीचे रणशिंग  फुंकले. मोदींच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने आपली काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक ठेवली. त्यानंतर जाहीर सभा घेत प्रचाराना नारळ काँग्रेसने फोडला. यावेळी प्रियंका गांधी यांनी युवकांना साद घातली. तुम्हीच या देशाचे कर्ते आहात. तुमचे मत तुम्हाला मजबूत करणारे शस्त्र हे विसरू नका, असे थेट आवाहन केले. येणाऱ्या दिवसात योग्य प्रश्न विचारा, हा तुमचा देश आहे तुम्ही या देशाला घडवले आहे, असे प्रियंका गांधी म्हणाल्यात. 

गेल्या तीन चार दिवसात गुजरातमधील काँग्रेसच्या तीन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात असणाऱ्या पाटीदारांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या हार्दिक पटेलांचा काँग्रेस प्रवेश करुन काँग्रेस मोदींना त्यांच्याच राज्यात शह देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे.

Read More