Marathi News> भारत
Advertisement

Parliament Security Breach : मोठी बातमी! नव्या संसद भवनात घुसखोरीचा प्रयत्न; तिघांना अटक

Parliament Security Breach : नव्या संसद भवनात घुसखोरीचा प्रयत्न; तिघांना अटक 

Parliament Security Breach : मोठी बातमी! नव्या संसद भवनात घुसखोरीचा प्रयत्न; तिघांना अटक

रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : (Parliament Security Breach) नव्या संसद भवनात घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला असून, पुन्हा एकदा हा प्रकार घडल्यामुळं एकच खळबळ माजली आहे. प्राथमिक माहितीनुसार घुसखोरी करणाऱ्या तिघांना सीआयएसएफकडून अटक करण्यात आली आहे. 

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अर्थात सीआयएसएफच्या जवानांनी कथित स्वरुपात बनावट आधार कार्डचा वापर करत उत्तस्तरीय सुरक्षाव्यवस्था असणाऱ्या या संसद भवन आणि परिसरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या या तीन मजुरांना सीआयएसएफनं अटक केली असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार कासिम, मोनिस 
आणि शोएब अशी या तिघांची नावं असून, त्यांच्यावर कट रचणं आणि फसवणूक अशा आरोपांअंतर्गत भारतीय दंडसंविधआनाअन्वये विविध कलमांअंतर्ग गुन्हा दाखल करण्यात आला. 

वरील संशयितांना संसद भवनातील एका प्रवेशद्वारापाशी सुरक्षा आणि ओळखपत्रांच्या तपासणीदरम्यान ताब्यात घेण्यात आलं. बनावट ओळखपत्र दाखवून संसद भवनात प्रवेश करण्याचा त्या तिघांचा कट असल्याची बाब तपासातून समोर आली. ओळखपत्र तपासत असतानाच  CISF च्या जवनानांना त्यामध्ये काही त्रुटी आढळून आल्या. ज्यानंतर हे पुरावे खोटे असल्याचं लक्षात येताच त्यांनी तातडीनं संशयितांना ताब्यात घेत सदर परिसरात सुरक्षेचा बंदोबस्त वाढवला. 

हेसुद्धा वाचा : PM Modis Oath Taking Ceremony : शेजारधर्म पहिला! पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी 'या' खास पाहुण्यांची हजेरी 

 

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार संसद भवनात  ‘डीवी प्रोजेक्ट्स लिमिटिड’ अंतर्गत या तिघांना एमपी लाऊंजसाठीचं काम मिळालं होतं. पण, त्यांच्या बनावट ओळखपत्रांनी सुरक्षा यंत्रणांना खडबडून जाग आली. 

संसद भवन परिसरात यापूर्वीही चुकीच्या पद्धतीनं प्रवेश करू पाहणाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्याशिवाय नुकतंच 6 जून रोजी दिल्लीचे उपराज्य्पाल वी. के. सक्सेना यांनी संसरदेतील सुरक्षेत हेळसांड केल्याच्या संशयावरून 6 जणांवर सक्तीच्या कारवाईचे आदेशही दिल्याचं पाहायला मिळालं होतं. 

Read More