Marathi News> भारत
Advertisement

Big News : पाकिस्तानच्या नापाक मनसुब्यांच्या चिंधड्या; सीमा भागात शोध घेतला आणि...

Ind- Pak : भारत - पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर सुरु असणाऱ्या घडामोडींना वेग. देशातील शांतता भंग करण्यासाठी शेजारी राष्ट्राच्या कुरापती सुरुच. 

Big News : पाकिस्तानच्या नापाक मनसुब्यांच्या चिंधड्या; सीमा भागात शोध घेतला आणि...

India Pakistan : भारत - पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर (ind pak loc) सुरु असणाऱ्या घडामोडींना पुन्हा एकदा वेग आला आहे. देशातील शांतता भंग करण्यासाठी शेजारी राष्ट्राच्या कुरापती सुरु असतानाच आता एक मोठी कारवाई पंजाब प्रांतात करण्यात आली आहे. यामध्ये  पाकिस्तानच्या नापाक मनसुब्यांच्या भारताकडून चिंधड्या करण्याच आल्याचं कळत आहे. 

सीमा भागात नेमकं काय घडतंय? 
भारत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरून (India Pakistan border) घुसखोरी करून आलेला ड्रोन पंजाबमध्ये पाडण्यात आला. शुक्रवारी सकाळी 4.30 वाजता बीएसएफने (BSF) ही कारवाई केली. बीएसएफ जवान पहाटे अजनाला गावालगत असलेल्या जंगलात गस्त घालत होते. तेव्हा जवानांना ड्रोनचा आवाज ऐकू आला. त्याचा शोध घेतला असता पाकिस्तानातून हा ड्रोन (Drone from pakistan) आल्याचं दिसलं. ज्यानंतर बीएसएफ जवानांनी तातडीने 17 राऊंड्स फायर करून हा ड्रोन पाडला. हा ड्रोन चिनी बनावटीचा असल्याचं समजत आहे. हा ड्रोन 10 किलो वजन घेऊन जाऊ शकतो अशीही माहिती समोर येत आहे. 

सदर घटनेनंतर DIG BSF प्रभाकर जोशी यांनी शाहरपुर BOP गाठली. घटनास्थळापासून साधारण 5 किमी अंतरावर असणाऱ्या परिसरात सध्या शोधमोहिम सुरु असून प्राथमिक माहितीनुसार कोणतीही संशयास्पद वस्तू हाती लागलेली नाही. 

Read More