Marathi News> भारत
Advertisement

भारत-चीन वादाचा लाभ उठविण्याच्या तयारीत पाकिस्तान, असा रचतोय कट

भारत-चीन सीमा विवाद पाकिस्तान (Pakistan) पोळी भाजण्याच्या प्रयत्नात आहे. नव्याने दहशतवादी डोंगर घाटीतून घुसविण्याच्या तयारी करत असल्याचा प्रकार पुढे आला आहे. 

भारत-चीन वादाचा लाभ उठविण्याच्या तयारीत पाकिस्तान, असा रचतोय कट

मुंबई : भारत-चीन सीमा विवाद पाकिस्तान (Pakistan) पोळी भाजण्याच्या प्रयत्नात आहे. नव्याने दहशतवादी डोंगर घाटीतून घुसविण्याच्या तयारी करत असल्याचा प्रकार पुढे आला आहे.  कश्मीरमध्ये कट रचन्याचा प्रयत्न पाकिस्ताकडून करण्यात येत आहे. कश्मीरमधील दहशतवाद्यांच्या माध्यमातून पाकिस्तान पाकिस्तानच्या सुरक्षा दलाचे कडे तोडण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आपली पकड मजबूत करण्यासाठी भर देत आहे. जाणकारांच्या माहितीनुसार हिजबुल मुजाहिदीन, लश्कर ए तैयबा आणि जैश ए मोहम्मद या दहशवादी संघटनांचे कंबरडे मोडल्यानंतर पाकिस्तान ISI या गुप्तचर यंत्रणाच्या माध्यमातून कट रचण्याच्या तयारीत आहे. 

पाकची गुप्तचर ISI एजन्सी  नवीन दहशतवादी संघटनेची स्थापना करण्याच्या प्रयत्नात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या मतानुसार, भारत आणि चीन यांच्यात सीमा वाद सुरु आहे. याचा लाभ उठवला पाहिजे. जर दहशतवादी हल्ला केला तर भारताकडून प्रत्युत्तर दिले जणार नाही. भारताचे लक्ष लडाख सीमावादाकडे लक्ष असेल. याचाच लाभ उठविण्यासाठी पाकिस्तान काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा प्रयत्न करेल. तसे पाकिस्तानचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती आहे. 

गुप्तचर यंत्रणाच्या माहितीनुसार अफगाणिस्तानच्या जलनाबादमधील एसएसजीकडून २०  तालिबान दहशतवाद्यांना एका डोंगरावर प्रशिक्षित देण्यात येत आहे.  कश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला करण्याची ही तयारी असल्याचे म्हटले जात आहे.

सुरक्षा एजन्सीच्या माहितीनुसार, सीमेपलीकडून ४०० ते ५०० दहशतवादी बर्फाळ डोंगरावरुन काश्मीर घाटीत प्रवेश करु शकतात. तसा घुसखोरीचा प्रयत्न सुरु आहे. आयईडीच्या अभ्यासकांच्यामते चार ते पाच दहशवादी सुरक्षा बलावर स्फोटकांमाध्यमातून हल्ला करु शकतात. तशी तयारी केल्याचे सांगण्यात येत आहे. हे दहशतवादी श्रीनगरच्या पंथा चौक,सोपोरच्या टाऊन हॉल, सोपोर-कुपवाडी बाईपास, बारामुल्ला हायवे तसेच हंडवारा-बारामुल्ला रोडवरुन जाणाऱ्या पथकावर गाडीची धडक देऊन हल्ला करु शकतात.  सुरक्षा दलाची तुकडी ज्या रस्त्यावर जाईल त्यावेळी हल्लाचा कट असू शकतो.

Read More