Marathi News> भारत
Advertisement

Shazia Marri: खायचे वांदे पण धमक्या 'अणुबॉम्ब'च्या; शेवटी वाकडी ती वाकडीच! पाकिस्तानची महिला मंत्री म्हणते...

India Vs Pakistan : बिलावल भुट्टो यांच्या वक्तव्यानंतर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी पाकिस्तानला फटकारलं होतं. त्यानंतर आता पाकिस्तानकडून (Pakistan Threaten To India) वादग्रस्त सुरू असल्याचं पहायला मिळतंय. 

Shazia Marri: खायचे वांदे पण धमक्या 'अणुबॉम्ब'च्या; शेवटी वाकडी ती वाकडीच! पाकिस्तानची महिला मंत्री म्हणते...

Pakistan Threaten To India: काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो (Bilawal Bhutto Zardari) यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. गुजरातचा कसाई म्हणत बिलावल भुट्टो झरदारी यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर आता पाकिस्तानची आगपखड सुरूच असल्याचं दिसतंय. पाकिस्तानच्या महिला मंत्र्याने वादग्रस्त वक्तव्य केलंय. (pakistan minister shazia marri threaten india of nuclear attack in Press Conference marathi news)

पाकिस्तानच्या मंत्रीमंडळातील महिला मंत्री शाजिया मर्री (Shazia Marri) यांनी भारताला अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी (Threat of nuclear attack) दिल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. बिलावल भुट्टो यांच्या समर्थनार्थ जिया मर्री यांनी पत्रकार परिषद (Shazia Marri Press Conference) घेतली त्यावेळी आमचं न्यूक्लिअर स्टेटस शांत राहण्यासाठी नाही, असं म्हणत त्यांनी थेट भारताला धमकी दिली आहे.

आम्ही भारताविरोधात कोणती तक्रार करत नाही. आमची तक्रार ही भारतामधील नरेंद्र मोदी सरकार (Narendra Modi Govt) यांच्याविरोधात आहे. भारताकडून नेहमी पाकिस्तानवर आरोप केले जातात. परंतु पाकिस्तान हे गुपचूप सहन करणार नसल्याचं वक्तव्य शाजिया मर्री यांनी केलंय. त्यानंतर आता भारतीयांमध्ये असंतोषाचं वातावरण पहायला मिळत आहे.

आणखी वाचा - MVA Morcha Mumbai : शिंदे- फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य!

दरम्यान, बिलावल भुट्टो यांच्या वक्तव्यानंतर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी पाकिस्तानला फटकारलं होतं. जर तुम्ही तुमच्या घराच्या मागं साप ठेवला तर तो फक्त शेजारीच नाही तर तुमच्या घरातील लोकांनाही चावेल, असं जयशंकर म्हणाले होते. त्यानंतर आता पाकिस्तानकडून (Pakistan Threaten To India) वादग्रस्त सुरू असल्याचं पहायला मिळतंय.

Read More