Marathi News> भारत
Advertisement

विंग कमांडर अभिनंदन यांना ताब्यात घेणारा 'तो' पाकिस्तानी सैन्यदल अधिकारी ठार

भारतीय सैन्यदलाच्या कारवाईत... 

विंग कमांडर अभिनंदन यांना ताब्यात घेणारा 'तो' पाकिस्तानी सैन्यदल अधिकारी ठार

मुंबई : भारतीय वायुदलाच्या सेवेत कार्यरत असणाऱ्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ताब्यात घेणाऱ्या पाकिस्तानी सैन्यदल अधिकाऱ्याला ठार करण्यात आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार नियंत्रण रेषेजवळ झालेल्या गोळीबारात त्यांना भारतीय सैन्याकडून ठार करण्यात आलं. 

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार पाकिस्तान सैन्यदलातील स्पेशल सर्व्हिस ग्रुपमध्ये सेवेत असणाऱ्या त्या अधिकाऱ्याचं नाव अहमद खान असं होतं. सुभेदार या पदावर ते सेवेत होते. १७ ऑगस्टला नाक्याल सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारात ही कारवाई करण्य़ात आली. ज्यावेळी ते घुसखोरांना भारताच्या हद्दीत प्रवेश करण्यात मदत करत होते. 

फेब्रुवारी महिन्यात बालाकोट एअर स्ट्राईकनंतरच्याच दिवसांमध्ये लगेचच भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या वायुदलांमध्ये चकमक झाली होती, ज्यानंतर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचं अपघातग्रस्त विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळलं. ज्यानंतर पाक सैनिकांच्या ताब्यात असणाऱ्या विंग कमांडर वर्धमान यांचे काही फोटो व्हायरल झाले होते. त्या फोटोंमध्ये एका दाढी असणाऱ्या व्यक्तीला (सैन्यदल अधिकाऱ्याला) अभिनंदन यांच्या मागे पाहिलं गेलं होतं. ही व्यक्ती म्हणजे अहमद खान असल्याचंच म्हटलं जात आहे.

fallbacks

अशी माहिती आहे, की अहमद खान नौशेरा, सुंदरबनी आणि पल्लन या भागातून घुसखोरांना भारताच्या हद्दीत प्रवेश करण्यासाठी मदत करायचा. जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांना भारतात प्रवेश करण्यास मदत करत काश्मीरमध्ये दहशतवादाची पाळंमुळं कायम ठेवण्याच्याच प्रयत्नांत तो असायचा. 

दरम्यान, त्याच्या याच कारवाया पाहता १७ तारखेला झालेल्या गोळीबारात त्याला ठार करण्यात आलं. पुंछमधील कृष्णाघाटी सेक्टरमध्ये भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नांत असणाऱ्यांवर निशाणा धरतेवेळी भारताकडून करण्यात आलेल्या गोळीबारात खान यांना ठार करण्यात आलं. 

Read More