Marathi News> भारत
Advertisement

पाकिस्तानी अॅंकरचे लाईव्ह शो दरम्यान अश्लील हावभाव, व्हिडिओ व्हायरल

 अॅंकरने लाईव्ह टीव्हीवर असे हावभाव दिले ज्यामुळे तो सोशल मीडियावर ट्रोल होतोयं.

पाकिस्तानी अॅंकरचे लाईव्ह शो दरम्यान अश्लील हावभाव, व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : पाकिस्तानी न्यूज अॅंकरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी अॅंकर लाइव्ह शो दरम्यान अश्लील इशारे करताना दिसतोय. आशिया कपमध्ये झालेल्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या मॅच दरम्यानचा हा व्हिडिओ आहे. ज्यामध्ये पाकिस्तानी अॅंकर लाईव्ह मॅचबद्दल सांगत आहेत. यावेळीच अॅंकरने लाईव्ह टीव्हीवर असे हावभाव दिले ज्यामुळे तो सोशल मीडियावर ट्रोल होतोयं.

हावभाव दिसले लाईव्ह 

 पाकिस्तानच्या न्यूज चॅनलवरच्या अॅंकरच्या हरकती स्थानिक पत्रकार सैयद रजा मेहदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केल्या आहेत.  मॅच दरम्यान लाईव्ह बुलेटीन सुरू असताना अॅंकरने मस्करीत अश्लील हावभाव केले. अॅंकरच्या या हावभाव करण्यावर सोबतची महिला अॅंकरदेखील हसली. दोन्ही अॅंकर ब्रेक दरम्यान मस्करी करत होते. तेव्हाच प्रोड्यूसरने चॅनल लाईव्ह केलं आणि त्याच्या हरकती सर्वांना दिसल्या. आपलं चॅनल लाईव्ह सुरू झालंय हे मस्ती करताना त्या अॅंकरच्या लक्षात आलं नाही. 

अॅंकरची खिल्ली 

 व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमुळे सर्वजण अॅंकरची खिल्ली उडवत आहेत. काहीजण हा व्हिडिओ हलका घेत आहेत तर काहीजण गंभीर झाले आहेत. अॅंकरचं वागणं लाजिरवाणं असल्याचं त्यांच म्हणणं आहे. बातम्या सांगताना अॅंकर एका प्रसिद्ध जाहिरातीची नक्कल करत असल्याचेही काहींचे म्हणणे आहे. 
 

Read More