Marathi News> भारत
Advertisement

video : बैलाचा महिलेवर हल्ला, सोशल मीडियावर व्हायरल

एखादा व्हिडीओ सोशल मीडियावर आल्यास तो व्हायरल होण्यास वेळ लागत नाही. मग तो कोणत्याही विषयासंबंधित असो. असाच एक गुजरातमधील व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

video : बैलाचा महिलेवर हल्ला, सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : एखादा व्हिडीओ सोशल मीडियावर आल्यास तो व्हायरल होण्यास वेळ लागत नाही. मग तो कोणत्याही विषयासंबंधित असो. असाच एक गुजरातमधील व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

या व्हिडीओत शांतपणे चालणारा बैल अचानकपणे पिवळी साडी घातलेल्या महिलेवर हल्ला करतो.  हा हल्ला इतका भीषण असतो की ती महिला पाच ते सात फूट दूर भिरकावली जाते. 

हा बैल शांतपणे रस्त्यावर चाललेला असतो. त्यामुळे हल्ला वगैरे करेल याची कोणालाही कल्पना नसते. अचानकपणे समोर चालणाऱ्या पिवळ्या रंगाच्या बाईला शिंगांच्या सहाय्याने इतक्या जोरात उडवतो की ती महिला साधारण पाच ते सात फूट दूर भिरकावली जाते. 

या घटनेने तेथे उपस्थि लोकांमध्ये एकच गोंधळ उडतो. त्यानंतर हा बैल जणू काही घडलेच नाही अशा अविर्भावात निघूनही जातो. 

Read More