Marathi News> भारत
Advertisement

सुषमा स्वराजांचं पार्थिव पाहून ढसाढसा रडू लागले ९६ वर्षीय MDH मसाले कंपनीचे मालक

एमडीएचच्या मालकांना अश्रृ अनावर

सुषमा स्वराजांचं पार्थिव पाहून ढसाढसा रडू लागले ९६ वर्षीय MDH मसाले कंपनीचे मालक

नवी दिल्ली : भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं मंगळवारी वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झालं. हृद्य विकाराचा झटका लागल्यामुळे त्यांचं निधन झालं. सुषमा स्वराज यांचं पार्थिव बुधवारी ३ तास भाजपच्या मुख्यालात ठेवण्यात आलं होतं. अनेक दिग्गज नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. एमडीएच मसाले कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी सुषमा स्वराज यांच्या पार्थिव शरीराचं दर्शन घेतल्यानंतर भावुक झाले. 

सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली देतांना त्यांना अश्रृ अनावर झाले. कंपनीचे मालक अनेकदा जाहिरातीत ही दिसतात. सध्या त्यांचा हा व्हिडिओ चांगलाचं व्हायरल झाला आहे.

अखेरच्या श्वासापर्यंत देशहिताचाच विचार करणाऱ्या सुषमा स्वराज यांनी अनुच्छेद ३७० रद्द झाल्याप्रकरणी ट्विटरच्या माध्यमातून आनंदही व्यक्त केला होता. त्यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्राच एक पोकळी निर्माण झाली आहे हे खरं असतं तरीही प्रकाशमान अशी त्यांची कारकिर्द कायमच पुढच्या पिढीसाठी आणि सध्या राजकारणात सक्रिय असणाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाला राजनाथ सिंह, जेपी नड्डा, रविशंकर प्रसाद, पीयूष गोयल यांनी खांदा दिला. 

Read More