Marathi News> भारत
Advertisement

गोव्यातील नोकऱ्यांत परप्रांतीयांना स्थान नाही- मनोहर आजगावकर

गोव्यातील नोकऱ्यांवर स्थानिक लोकांचाच अधिकार आहे.     

गोव्यातील नोकऱ्यांत परप्रांतीयांना स्थान नाही- मनोहर आजगावकर

पणजी : परप्रांतातील लोकांबाबतीत आक्रमक भुमिका घेणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अनेकांनी पाहिले आहे. राज ठाकरे यांच्या पाउलांवर पाउल ठेऊन गोव्यातील पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे. गोव्यातील नोकऱ्यांवर स्थानिक लोकांचाच अधिकार आहे. गोव्यात स्थानिक असलेल्या लोकांनाच नोकऱ्यात प्राधान्य दिले जाणार आहे. असे गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. गोव्याचे भूमीपुत्र आजगावकर यांच्या वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. २०१७ मध्ये आजगावकर यांनी लमाणी लोकांच्याबाबतीत वादग्रस्त व्यक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की लामणी लोक गोव्याच्या किनाऱ्यावर उपद्रव निर्माण करतात. त्यांच्या या व्यक्तव्यामुळे अदिवासी नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टिका केली होती.

मंगळवारी एका पत्रकार परिषदेत पर्यटनमंत्री यांनी महाराष्ट्रातील लोकांना गोव्यात नोकऱ्या नाहीत असे सांगत होते. बंदरे स्वच्छ करण्याच्या कंत्राटाची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. परप्रांतीयातील लोकांचा यात वाटा नको. गोव्यातील लोकांनाच या नोकरीत प्राधान्य दिले पाहिजे. महाराष्ट्रातील लोक येथे येता कामा नये. पत्रकार परिषदेत मनोहर यांनी महाराष्ट्रातील लोकांचा घाटी म्हणून उल्लेख केला होता. तिथे उपस्थित असणाऱ्या पत्रकाराने ‘घाटी’ हा शब्द वापरल्यावर तो बदनामीकारक आहे असे काही पत्रकारांनी त्यांच्या लक्षात आणून दिले. त्यावर मनोहर म्हणाले  की, हा शब्द खराब नसुन, जे लोक घाटावर राहतात. अशा लोकांना घाटी म्हटले जाते.  

Read More