Marathi News> भारत
Advertisement

आता Driving Licence बनवणे सोपं नाही. पहिला पूर्ण करावा लागणार Video Tutorial चा कोर्स

ज्यांना नवीन ड्रायव्हिंग लायसन्स काढायचा आहे, त्यांना आता एक महिना अगोदर व्हिडिओ ट्यूटोरियल पहावे लागेल आणि सुरक्षित ड्रायव्हिंगच्या नियमांना खोलीत समजून घावे लागेल, त्यानंतरच ते ड्रायव्हिंग टेस्ट देण्यास पात्र ठरतील.

 आता Driving Licence बनवणे सोपं नाही. पहिला पूर्ण करावा लागणार Video Tutorial चा कोर्स

मुंबई :  ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी आता तुम्हाला एक महिना अगोदर पासूनच तयारी करावी लागेल. ज्यांना नवीन ड्रायव्हिंग लायसन्स काढायचा आहे, त्यांना आता एक महिना अगोदर व्हिडिओ ट्यूटोरियल पहावे लागेल आणि सुरक्षित ड्रायव्हिंगच्या नियमांना खोलीत समजून घावे लागेल, त्यानंतरच ते ड्रायव्हिंग टेस्ट देण्यास पात्र ठरतील.

नवीन ड्रायव्हिंग लायसन्ससाठी Video Tutorials सक्तीचं

नवीन ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी लोकांना आता, त्या लोकांच्या कुटुंबातील सदस्यांचा Video Tutorials मध्ये व्हिडिओ दाखवला जाणार आहे, ज्या लोकांचं  खराब ड्रायव्हिंगमुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे लोकांना सुरक्षित ड्रायव्हिंगचं महत्त्व समजेल.

ज्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे त्यांनाही कोर्स करने गरजेचं

ज्या वाहन चालकांकडे  ड्रायव्हिंग लायसन्स आहे त्यांच्यासाठी सुद्धा काही नियम सक्तीचे केलं आहे. वाहन चालक जर कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळल्यास त्यांना ड्रायव्हर सेफ्टी प्रमाणपत्र अभ्यासक्रम  (Driver Safety Certificate Course) करावा लागेल.

या वाहनचालकांना तीन महिन्यांत रीफ्रेशर कोर्स पूर्ण करावा लागणार आहे. यासाठी या वाहनचालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स (DL) त्यांच्या आधारशी जोडले जातील, जेणेकरून त्यांनी कोर्स पूर्ण केला आहे की नाही याची माहिती मिळेल.

31 ऑक्टोंबरपासून नवीन यंत्रणा

रस्ते वाहतूक मंत्रालयाने स्थानिक पोलिसांना आदेश दिले आहेत की, टोल प्लाझा ओलांडताना हेल्मेट न घातलेल्या दुचाकीस्वारांचे फोटो शेअरकरुन त्यांना दंड आकारण्यात यावा. ही यंत्रणा सुरू करण्यासाठी 31 ऑक्टोबरची अंतिम मुदतदेखील निश्चित केली गेली आहे.

2019 मध्ये दुचाकी चालक आणि त्यांच्या बरोबर मागील सीटवर बसलेल्या 44,666 लोकांचा हेल्मेट न घातल्यामुळे मृत्यू झाला आहे.

कोर्स पूर्ण न केल्यास बनवता येणार नाही DL

नवीन  ड्रायव्हिंग लायसन्स ऍप्लीकेशनसाठी ऑनलाईन व्हिडियो ट्यूटोरियल आणि ज्यांच्याकडे आधीच  ड्रायव्हिंग लायसन्स आहे, त्यांच्यासाठी  सेफ्टी सर्टिफिकेशन कोर्स हा प्रोटोकॉल पुढच्या काही आठवड्यात MV ऍक्टखाली सेंट्रल मोटर व्हेईकल रूल्समध्ये सामावून घेतले जाईल. त्यामुळे कोणती ही व्यक्ति या ऑनलाईन ट्यूटोरियला पूर्ण केल्या शिवाय ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अप्लाय करु शकत नाही.

Read More