Marathi News> भारत
Advertisement

Optical Illusion : तुम्हाला दिसतोय का निळ्या डोळ्यांचा कोल्हा? 99 टक्के लोकं शोधू शकले नाहीयेत

तुम्हाला इतक्या या कोल्ह्यांमधून ब्लू आय फॉक्स शोधून काढायचा आहे.

Optical Illusion : तुम्हाला दिसतोय का निळ्या डोळ्यांचा कोल्हा? 99 टक्के लोकं शोधू शकले नाहीयेत

मुंबई : Optical Illusion हे असे फोटो आहेत जी आपल्या मनाला गोंधळात टाकतात. असाच एक गोंधळात टाकणारा फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल होतोय. या फोटोमध्ये बरेच कोल्हे आपल्याला दिसतायत. मात्र तुम्हाला इतक्या या कोल्ह्यांमधून ब्लू आय फॉक्स शोधून काढायचा आहे.

या फोटोतील बहुतेक कोल्ह्यांचे डोळे तपकिरी आहेत. अशातच निळ्या डोळ्यांचा कोल्हा शोधणं हे मोठं काम आहे. हे मजेदार कोडं सोडवण्यासाठी तुम्हाला कितीही वेळ लागू शकतो. मात्र तुम्हाला हे काम अवघ्या 25 सेकंदात करायचं आहे. जर तुम्ही असं केलंत तर तुम्ही रेकॉर्ड होल्डर बनू शकता कारण बहुतेक लोकांना हे काम इतक्या कमी वेळात पूर्ण करता आलेलं नाही.

हे कोडे Book an Eye Test ने तयार केलंय. सहसा, हे कोडे सोडवण्यासाठी लोकं 1 मिनिट 13 सेकंद इतका वेळ घेतात. परंतु जर कोणी हे कार्य केवळ 25 सेकंदात पूर्ण केलं तर तो रेकॉर्ड होल्डर होईल.

कार्टूनप्रमाणे दिसणाऱ्या या फोटोमध्ये फक्त तपकिरी डोळे असलेले कोल्हे दिसत आहेत. फोटो स्पष्ट आहे, परंतु निळ्या रंगाचे डोळे असलेल्या कोल्ह्याला शोधण्यासाठी थोडं डावीकडे आणि खाली पहावं लागेल.

fallbacks

फोटोमध्ये दिसणाऱ्या या कोल्ह्यांमध्ये, निळ्या डोळ्यांचा कोल्हा जोडीने उभा असलेला तुम्हाला दिसेल. Optical Illusion ही अशी चित्रं आहेत जी मानवी मेंदू आणि डोळ्यांचा समन्वय दर्शवतात.

Read More