Marathi News> भारत
Advertisement

Optical Illusion: हत्तींच्या कळपात लपलाय एक गेंडा; 10 सेकंदात शोधून दाखवा

आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक ऑप्टिकल इल्युजन टेस्ट घेऊन आलो आहोत

Optical Illusion: हत्तींच्या कळपात लपलाय एक गेंडा; 10 सेकंदात शोधून दाखवा

मुंबई : ऑप्टिकल इल्यूजन, ब्रेन टीझर किंवा कोडं सोडवणं कोणाला आवडत नाही? ते कोणत्याही प्रकारचं असू शकते. हे चित्र, स्केच किंवा अगदी रेषांच्या बाबतीत असू शकते. या कोडींबद्दल जर एखादी अवघड गोष्ट असेल तर ते उत्तर आहे. ते मिळवण्यासाठी भल्याभल्यांना घाम गाळावा लागतो. ऑप्टिकल इल्युजन चाचणी केवळ आपला IQ तपासत नाही तर विचार करण्याची क्षमता देखील वाढवते. यासोबतच तुमच्या मेंदूचाही व्यायाम होतो.

आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक ऑप्टिकल इल्युजन टेस्ट घेऊन आलो आहोत, जी तुम्हाला डोकं खाजवण्यासाठी भाग पाडणार आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये हत्तींचा कळप बॉलशी खेळत आहे. त्यांच्यामध्ये कुठेतरी एक गेंडाही लपलेला आहे. लपलेला गेंडा 10 सेकंदात शोधून सांगणं हे आव्हान आहे. 

मग उशीर कशाला करताय? तयार व्हा आणि तुमची वेळ आता सुरू झाली. शोधा या चित्रामध्ये लपलेला गेंडा.

तुम्हाला गेंडा दिसला का?

तुमच्यापैकी अनेकांना गेंडा दिसला असेल, पण काहींना तो अजूनही शोध. तुम्हाला अजूनही गेंडा सापडला नाही, तर तो शोधण्यात आम्ही तुम्हाला थोडी मदत करू. फोटोकडे बारकाईने पाहिल्यास, कळपात उपस्थित असलेल्या सर्व हत्तींचा रंग सारखाच आहे. त्याच वेळी, आपण चित्राच्या वरच्या उजव्या भागाकडे पाहिल्यास, आपल्याला एक दगड दिसेल. गेंडा त्याच्या वरच लपला आहे.

आता कदाचित तुम्हाला गेंडा सापडला असेल. जर तुम्ही अजूनही गोंधळलेले असाल, तर तुम्ही हत्ती आणि गेंड्याच्या चेहऱ्यात फरक तुमच्या लक्षात येईल.

fallbacks

Read More